Sat, Dec 27, 2025

वांग दूर करण्यासाठी महागडी ट्रीटमेंट घेताय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय आहेत फायदेशीर

Published:
चेहऱ्यावर अनेकदा काळे डाग दिसतात. हे मोठे डाग वांग म्हणून ओळखले जातात.
वांग दूर करण्यासाठी महागडी ट्रीटमेंट घेताय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय आहेत फायदेशीर

Ayurvedic remedies for melasma:   चेहऱ्यावरील काळे डाग किंवा वांग हे केवळ सौंदर्य कमी करत नाहीत तर, ती एक अंतर्गत आरोग्य समस्या आहे. आयुर्वेदानुसार वांगची समस्या पित्त दोष आणि रक्तातील अशुद्धतेचे असंतुलन यांच्यामुळे उद्भवते. तर सायन्सनुसार व्हिटॅमिन्स सी, डी, बी१२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता त्यांना कारणीभूत ठरते. तसेच जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळेदेखील वांगचा धोका वाढतो.

वांग दूर करण्यासाठी महागड्या उपचारांऐवजी, आयुर्वेदिक उपाय आणि आहारातील बदल आराम देऊ शकतात. आज आपण असेच काही उपाय जणू घेऊया…..

हळद आणि कोरफड-
वांग दूर करण्यासाठी कच्ची हळद बारीक करून ती ताज्या कोरफडमध्ये मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा लावा. हळद डाग कमी करते, तर कोरफड मॉइश्चरायझ करते.

मंजिष्ठा-
मंजिष्ठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ज्याचे त्वचेवर अनेक फायदे आहेत. ती रक्त शुद्ध करणारी आहे आणि त्वचेला आतून निरोगी करते. तिची गोड, कडू आणि तुरट चव प्रभावीपणे पित्त शांत करते. त्याचा वापर त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतो. वांगवर उपचार करण्यासाठी मंजिष्ठा कॅप्सूल दिवसातून एक किंवा दोनदा घेता येतात. तुम्ही मंजिष्ठा पावडर मधात मिसळून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या. काही दिवसांतच फरक दिसून येईल.

चंदन-
एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. काळे डाग असलेल्या भागांवर ते फेस मास्क म्हणून लावा. २० मिनिटे ठेऊन नंतर चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे करा.

ऑइल मसाज-
वांग दूर करण्यासाठी ग्लिसरीन ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेलात मिसळा आणि गोलाकार पद्धतीने मालिश करा. कोरड्या त्वचेसाठी, आठवड्यातून दोनदा, तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून एकदा वापरा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि वांग दूर होऊन चमक येते.

गुलाबजल आणि कच्चे दूध-
वांग कमी करण्यासाठी गुलाबजल आणि कच्चे दूध दोन्ही एकत्र मिसळून पेस्ट तयार करा आणि लावा. दूध छिद्रे स्वच्छ करते, तर गुलाबपाणी ताजेतवाने करते. यामुळे चेहऱ्यावरील वांग कमी होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)