मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ ४ गोष्टी, सुधारेल स्मरणशक्ती

Published:
रात्री काही चांगल्या सवयी अंगीकारल्याने तुमच्या मेंदूची क्षमता तर वाढतेच, शिवाय तुमची एकाग्रता आणि शिकण्याची क्षमताही सुधारते.
मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ ४ गोष्टी, सुधारेल स्मरणशक्ती

What to do to increase memory:   आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टी विसरतो. याचे मुख्य कारण म्हणजे अतिश्रम, ताणतणाव आणि अनहेल्दी लाइफस्टाईल असू शकते. चांगल्या स्मरणशक्तीसाठी, दिवसभर मन सक्रिय ठेवणेच महत्त्वाचे नाही तर झोपण्यापूर्वी स्वतःला चांगल्या सवयी लावणेदेखील महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभरातील घटनांवर प्रक्रिया करतो आणि नवीन आठवणी तयार करतो.

रात्री काही चांगल्या सवयी अंगीकारल्याने तुमच्या मेंदूची क्षमता तर वाढतेच, शिवाय तुमची एकाग्रता आणि शिकण्याची क्षमताही सुधारते. विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी काही गोष्टींमध्ये सहभागी झाल्याने तुमच्या स्मरणशक्तीत सकारात्मक बदल होतील, मेंदूची क्रिया सुधारेल. आज आपण स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करणारे काही उपाय जाणून घेऊया…..

स्ट्रेचिंग करा –
रात्री हलके स्ट्रेचिंग किंवा योगा केल्याने मनाला आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे ताण आणि चिंता कमी होते, ज्यामुळे मनाला आराम मिळतो आणि स्मरणशक्ती मजबूत होते.

ब्रीदिंग एक्सरसाईज-
ही एक वैज्ञानिक श्वास घेण्याची पद्धत आहे जी केवळ ताण कमी करत नाही तर मनालाही शांत करते. या तंत्राचा अवलंब केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि लक्ष केंद्रित होते.

मेंदूचा व्यायाम करा –
ज्याप्रमाणे शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मन सक्रिय ठेवण्यासाठी मेंदू प्रशिक्षण आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे मेंदूला ताण देणारे खेळ खेळणे किंवा कोडी सोडवणे स्मरणशक्ती सुधारू शकते.

रात्री ध्यान करा –
झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे ध्यान केल्याने मनाला आराम मिळतो आणि ताण कमी होतो. संशोधनानुसार, नियमित ध्यान स्मरणशक्ती मजबूत करते. ध्यान खोल आणि शांत झोपेला प्रोत्साहन देते. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते.

डिजिटल गोष्टींपासून दूर राहा –
झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्याने मेंदूवर अनावश्यक ताण येतो. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो.जो झोपेमध्ये व्यत्यय आणतो आणि मेंदूला योग्य विश्रांती मिळण्यापासून रोखतो. त्यामुळे रात्री डिजिटल गोष्टींपासून दूर राहा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews