MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

मेंदू तीक्ष्ण आणि चपळ बनवण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय, वेगाने वाढेल स्मरणशक्ती

Published:
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहारापासून ते मेंदू तीक्ष्ण बनवणाऱ्या गेम्सपर्यंत अनेक प्रयत्न केले जातात.
मेंदू तीक्ष्ण आणि चपळ बनवण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय, वेगाने वाढेल स्मरणशक्ती

Tips to increase memory power:  आपल्या सर्वांनाच माहिती आहे मेंदू हा शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी मेंदू निरोगी असणे महत्वाचे आहे. तर मेंदू निरोगी राहण्यासाठी शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे. म्हणजेच दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दोन्ही निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वसाधारणपणे मेंदू तीक्ष्ण असलेल्यांना बुद्धिमान किंवा हुशार म्हटले जाते.

त्यामुळेच अगदी लहानपणापासूनच मुलांना बुद्धी चपळ करण्यासाठी पालक विविध गोष्टी करते असतात. पौष्टिक आहारापासून ते मेंदू तीक्ष्ण बनवणाऱ्या गेम्सपर्यंत अनेक प्रयत्न केले जातात. आजकाल अनेकांना छोट्या-मोठ्या गोष्टी विसरण्याची समस्या होत आहे. त्यामुळे मेंदू कसा तीक्ष्ण बनवावा आणि कशाप्रकारे स्मरणशक्ती वाढवायची याबाबत जाणून घेऊया…..

 

व्यायाम आणि योग-

नियमित व्यायाम शरीरासाठी तर उत्तम असतोच शिवाय मेंदूसाठीही चांगला असतो. व्यायाम आणि योग केल्याने ताणतणाव दूर होतो. तसेच आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढते. तसेच मेंदूला पुरेसे ऑक्सिजन, रक्त आणि पोषण मिळते. त्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

 

 

ड्रायफ्रूट्स-

मेंदूचे कार्य सुधारून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज ड्रायफ्रूट्स खाणे खूप फायदेशीर असते. मेंदू तीक्ष्ण बनवण्यासाठी बदाम सर्वात जास्त चांगले समजले जाते. दररोज रात्री ५ बदाम भिजत ठेवा. सकाळी उठून ते खा. असं नियमित केल्याने मेंदू तीक्ष्ण होऊन स्मरणशक्ती सुधारते.

पुरेसे पाणी प्या-
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याला हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. दिवसभरात पुरेसे पाणी पिल्याने मेंदूला इलेक्ट्रिकल ऊर्जा मिळते. जी आपल्या मेंदूच्या कार्यसाठी आवश्यक असते. पाण्याने मेंदूचे कार्य सुधारून मेंदू तीक्ष्ण होतो. स्मरणशक्ती सुधारते आणि तणावही दूर होतो.

योग्य आहार-
आहारात बाहेरील जंकफूड खाण्याऐवजी फळे आणि हिरवा भाजीपाला खावा. फळे आणि हिरव्या भाजीपाल्यामध्ये असलेले महत्वाचे घटक मेंदूच्या रक्तवाहिन्यांना निरोगी आणि लवचिक बनवतात. त्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो. तसेच बुद्धी चपळ होण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)