How to apply AI Courses : एआय म्हणजेच आर्टिफिशियल इन्टेलिजन्सची वाढती मागणी पाहता शिक्षण मंत्रालयाने मोठं पाऊल उचललं आहे. मंत्रालयाने ई लर्निंग स्वयम पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी पाच फ्री एआय कोर्स लाँन्च केले आहेत. आता या कोर्सच्या मदतीने विद्यार्थी केवळ तंत्रज्ञानाची छोट्या छोट्या गोष्टींसह प्रात्यक्षित अनुभवही घेऊ शकतील. ते पाच कोर्स कोणते, कालावधी किती आणि कसं कराल अप्लाय?
हे आहेत फ्री कोर्स
१ AI/ML using python
यामध्ये स्टॅटिस्टिक्स, लीनियर एल्जेब्रा, ऑप्टिमायजेशन आणि डेटा व्हिज्युवलायजेशनचं बेसिक शिकवलं जाईळ.
या कोर्समध्ये पायथन भाषेवर फोकस असेल
या कोर्सचा कालावधी ३६ तास असेल.
२ Cricket Analytics With AI
या कोर्समध्ये क्रिकेटला उदाहरण बनवून स्पोर्टस अॅनालिटिक्स शिकवलं जाईल. हा २५ तासांचा कोर्स आहे.
३ AI in Physics
मशिन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्सच्या माध्यमातून या कोर्समध्ये फिजिक्स कसं सोडवता येईल, याबाबत शिकवलं जाईल. हा कोर्स ४५ तासांचा असेल.
४ AI in Accounting
या कोर्सच्या माध्यमातून अकाऊंटिंग प्रॅक्टिसमध्ये एआयचा वापर कसा करू शकता हे सांगितलं जाईल. या कोर्सचा कालावधी ४५ तासांचा असेल.
५ AI in Chemistry
या कोर्सच्या माध्यमातून औषध डिजाइन, मॉलेक्यूल प्रॉपर्टीज प्रेडिक्शन आणि रिअॅक्शन मॉडलिंग शिकवलं जाईल. हा कोर्सदेखील ४५ तासांचा असेल.
कसं कराल अप्लाय?
– या सर्व कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी swayam पोर्टलवर लॉग इन करून कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
– या कोर्सची नोंदणी प्रक्रिया सोपी आहे. या कोर्ससाठी कोणतेही शुल्क नाही.
– कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल.





