Marathi News

सकाळी-सकाळी करा ‘या’ ६ गोष्टी, दिवसभर राहाल फ्रेश आणि निरोगी

Published:
सकाळची सुरुवात योग्यरीत्या केल्यास तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. शिवाय अनेक आरोग्य समस्या दूर होतात.
सकाळी-सकाळी करा ‘या’ ६ गोष्टी, दिवसभर राहाल फ्रेश आणि निरोगी

Morning Healthy Routine in Marathi:   आपल्या आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य आपल्या सकाळच्या सवयींमध्ये आहे. योग्य गोष्टीने दिवसाची सुरुवात केल्याने शरीराला ऊर्जा मिळतेच, शिवाय आजारांशी लढण्याची क्षमताही वाढते. आज आपण अशाच काही हेल्दी सवयी जाणून घेणार आहोत….

कोमट पाणी-
सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. ते शरीराचे अवयव सक्रिय करते आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करते. तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर काढण्यास मदत होते.

व्यायाम-
तुमच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी सुमारे ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करा. व्यायामामुळे रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. जर तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही घरी योगा, चालणे, सायकलिंग किंवा पोहणे असे हलके व्यायाम करू शकता.

अंघोळ-
व्यायामानंतर, आंघोळ करणे फायदेशीर ठरते. आळसामुळे आपण अनेकदा आंघोळ करणे टाळतो, परंतु आंघोळ केल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटण्यास मदत होते.

ग्रीन टी-
दिवसाची सुरुवात एक कप ग्रीन टी किंवाकोणत्याही हर्बल टीने केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे पचनास मदत करतात आणि दिवसभर तुम्हाला फ्रेशनेस जाणवतो.

हेल्दी नाश्ता-
तज्ज्ञांच्या मते, नाश्ता कधीही वगळू नका.दिवसाची सुरुवात करण्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. रिकाम्या पोटी जंक फूड, फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ टाळा. दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी तुमचा नाश्ता प्रोटीनयुक्त बनवा.

दिनचर्या निश्चित करा-
दिवसभराच्या कामांची यादी बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु सकाळी काही मिनिटे देऊन तुमच्या दिवसभराची कामे, मिटींग्स, इतर कामे यांचे नियोजन केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ देता येतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews