What to eat to build muscles: आजकाल बहुतांश लोक आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. निरोगी राहण्यासाठी विविध शारीरिक समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यातीलच एक म्हणजे स्नायू होय. निरोगी राहण्यासाठी स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे. कमकुवत स्नायूंमुळे किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
स्नायूंचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. तर काहीजण त्यासाठी विविध प्रोटीन पावडर आणि गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. पण स्नायूंच्या मजबुतीसाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते. जंकफूड आणि इतर चुकीचे पदार्थ खाल्ल्याने तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.आज आपण स्नायू मजबूत बनवण्यासाठी काय काय खावे याबाबत जाणून घेऊया…..
दूध –
हाडांसाठी दूध खूप फायदेशीर मानले जाते. त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर स्नायू मजबूत करण्यासाठी दूध पिणे आवश्यक आहे. दूध प्रोटीन आणि अमीनो आम्लांनी समृद्ध आहे.जे स्नायूंच्या वाढीस आणि दुरुस्तीला चालना देण्यास मदत करते.
अंडी –
जर तुम्हाला अंडी खाण्याची आवड असेल तर अंडी तुमच्या स्नायूंसाठी एक निरोगी पर्याय असू शकतात. अंडी खाल्ल्याने स्नायूंची निर्मिती वेगाने होते आणि स्नायूंचा कमकुवतता कमी होतो. अंड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात अमीनो आम्ल असतात, जे स्नायूंच्या ऊती वाढविण्यास आणि स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत करतात. स्नायूंच्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता.
केळी –
जर तुमचे स्नायू कमकुवत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात केळी समाविष्ट करू शकता. केळी खाल्ल्याने नव्या स्नायूंची निर्मिती होण्यास मदत होते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम आणि ऊर्जा असते. ते खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि स्नायूंची पुनर्प्राप्ती होते. जर तुम्ही बॉडीबिल्डर असाल तर स्नायूंची पुनर्प्राप्ती देखील आवश्यक आहे. केळी खाल्ल्याने स्नायू दुरुस्त होण्यास आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित करण्यास मदत होते.
पालक –
पालक ही आरोग्यासाठी एक उत्तम आणि फायदेशीर पालेभाजी आहे. ते खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो आणि स्नायू मजबूत होतात. पालकामध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते. जे रक्त प्रवाह वाढवते आणि स्नायूंचा कमकुवतपणा कमी करते. स्नायू निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या नियमित आहारात पालकचा समावेश करू शकता. पालकामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण देखील चांगले असते, जे स्नायूंच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करते आणि स्नायूंचा कमकुवतपणा कमी करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





