Remedies for Period Cramps: दर महिन्यातील मासिक पाळीचे काही दिवस महिलांसाठी खूप त्रासदायक असतात. दरम्यान त्यांना वेदना आणि मूड स्विंगचा सामना करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना आणि पोटातील गोळे पिरियड क्रॅम्प म्हणून ओळखले जातात.
पिरियड क्रॅम्प्स प्रत्येक महिलेनुसार बदलतात. काही महिलांना मासिक पाळी दरम्यान सौम्य वेदना होतात, तर काहींना इतक्या वेदना होतात की त्यांना आराम मिळवण्यासाठी पेनकिलर घ्यावी लागतात. परंतु जर तुम्हाला नैसर्गिकरित्या मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल, तर तुम्ही या गोष्टी तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता. चला पाहूया…..
तुप घालून पाणी पिणे-
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात तूपाचे पाणी समाविष्ट करू शकता. तूपाचे पाणी पोटफुगी कमी करण्यास मदत करू शकते.ज्यामुळे पीरियड क्रॅम्प कमी होतात. तुमच्या पीरियड दरम्यान दररोज एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा तूप मिसळून प्या.
डार्क चॉकलेट-
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात डार्क चॉकलेटचा देखील समावेश करू शकता. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्हनॉल नावाचे एक संयुग असते, जे जळजळ कमी करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. डार्क चॉकलेटचा एक छोटासा तुकडा खाल्ल्याने तुमच्या शरीरात एंडोर्फिन बाहेर पडतात, जे पोटातील गोळे कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करू शकते.
नाभीला तेल लावणे-
मासिक पाळी दरम्यान नाभीला तेल लावल्याने देखील आराम मिळू शकतो. खोबरेल किंवा तिळाचे तेल थोडेसे गरम करून, नाभीला काही थेंब लावल्याने आणि हलक्या हाताने मालिश केल्याने तुमच्या गर्भाशयाला आराम मिळतो आणि पोटातील वेदना कमी होतात.
तीळ आणि गूळ-
मासिक पाळी दरम्यान तीळ आणि गूळ एकत्र खाणे देखील मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे मिश्रण तुमच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकते कारण तिळात सेसामिन संयुगे असतात, ज्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. गूळ नैसर्गिक स्वीटनर म्हणून काम करतो, परंतु पोटदुखी कमी करण्यास मदत करू शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






