Remedies for fatigue during periods:   मासिक पाळी दरम्यान महिलांना विविध आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, पोटात गोळे येणे, अपचन, पोटफुगी आणि भूक न लागणे अशा समस्या सामान्य आहेत. पण काही महिलांना या समस्या खूप दिवस जाणवतात, तर काहींना मासिक पाळीनंतर कोणतीही आरोग्य समस्या येत नाही.

यासाठी महिलांनी मासिक पाळी दरम्यान त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या काळात जास्त रक्तस्त्राव होते ज्यामुळे त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळेच आपण जाणून घेऊया की थकवा दूर करण्यासाठी मासिक पाळी दरम्यान महिलांनी त्यांच्या आहारात काय समाविष्ट करावे…..

गूळ-
गूळ हा लोहाचा नैसर्गिक स्रोत आहे.जो मासिक पाळी दरम्यान थकवा आणि कमकुवतपणाशी लढण्यास मदत करू शकतो. शिवाय त्यातील उष्ण गुणधर्मामुळे त्याचा तुमच्या पोटावर उबदारपणाचा प्रभाव पडतो. ज्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

पालक-
महिलांच्या शरीरात मासिक पाळी दरम्यान लोहाची कमतरता निर्माण होते. आणि ती कमतरता पुन्हा भरून काढणे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही पालक सारख्या लोहयुक्त हिरव्या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

खजूर-
मासिक पाळी दरम्यान, महिलांना पॉट, कंबरदुखी आणि गोळे येतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त खजूर समाविष्ट करू शकता. खजूर खाल्ल्याने मासिक पाळीतील गोळे कमी होण्यास मदत होते.

आले-
आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात.जे मासिक पाळीतील गोळे कमी करण्यास आणि गर्भाशयाच्या आकुंचनांना शांत करण्यास मदत करतात.

केळी-
केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे मासिक पाळी दरम्यान डिहायड्रेशन टाळण्यास आणि हातापायातील गोळे कमी करण्यास मदत करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)