Marathi News

अनियमित मासिक पाळीची समस्या दूर करतात ‘ही’ ४ योगासने

Published:
योगा केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होण्यास आणि पोटातील वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
अनियमित मासिक पाळीची समस्या दूर करतात ‘ही’ ४ योगासने

Yoga Asanas for Regular Period:   मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः हिवाळ्याच्या काळात, मासिक पाळीमुळे पोटदुखी, कंबरदुखी, पाय दुखणे आणि मूड स्विंग्स या समस्या वाढतात. हिवाळ्यात, महिलांच्या शरीरात विविध हार्मोनल बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि आहारातील बदल यामुळे मासिक पाळी अनियमित होते.

अशा परिस्थितीत, योगा केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होण्यास आणि पोटातील वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. मासिक पाळी महिन्याला येण्यास कोणते योगासने मदत करू शकतात याबाबत जाणून घेऊया……

मत्स्यासन –
मत्स्यासन केल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. हे आसन थायरॉईड आणि पिट्यूटरी ग्रंथींना सक्रिय करते, जे मासिक पाळी नियमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे योगासन नियमित केल्याने पोटात आणि शरीराच्या खालच्या भागात रक्त प्रवाह सुधारतो. ज्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

सुप्त बद्धकोनासन-
सुप्त बद्धकोनासनाचा नियमित सराव मासिक पाळीतील त्रास कमी करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी फायदेशीर मानला जातो. हे आसन नियमित केल्याने गर्भाशय आणि ओटीपोटाच्या स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे मासिक पाळीशी संबंधित वेदना कमी होऊ शकते.

बद्ध कोनासन –
बद्ध कोनासन हे महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे आसन पेल्विक भागात रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे गर्भाशय आणि अंडाशय सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात हे आसन केल्याने मांड्या, कंबर मजबूत होण्यास मदत होते. ज्यामुळे मासिक पाळी नियमित येते. यामुळे ताण कमी होण्यास आणि हार्मोनल संतुलन राखण्यास देखील मदत होते.

भुजंगासन-
भुजंगासनाच्या नियमित सरावामुळे पोट आणि पाठीच्या कण्यातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. या आसनाच्या नियमित सरावामुळे गर्भाशयाच्या सभोवतालच्या भागात रक्त प्रवाह वाढतो आणि मासिक पाळीच्या वेळी वेदना कमी होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews