Home remedies to reduce pimples: पिंपल्स ही एक सामान्य समस्या मानली जाते. लोकांना कोणत्याही वयात ते येऊ शकतात. धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि घाण यामुळे चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागांवरसुद्धा पिंपल्स येतात. पिंपल्स येण्यास अनेक घटक जबाबदार असतात.
काही लोकांना सुरुवातीला लहान पिंपल्स येतात आणि नंतर ते मोठे होऊ शकतात. अनेकदा त्याला खाजही सुटते. वेळेवर खबरदारी घेतल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. आज आपण पिंपल्स दूर करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या याबाबत जाणून घेऊया……
ताणतणाव कमी करा-
ताणतणाव हेदेखील पिंपल्सचे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढते. ज्यामुळे तेल ग्रंथी अधिक तेल तयार करण्यास प्रवृत्त होतात. आणि त्यामुळे पिंपल्स येतात. ताण व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करू शकता. हे मानसिक शांती आणि संतुलन राखण्यास मदत करतात.
पौष्टिक आहार-
तुमच्या आहाराचा तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने पिंपल्स वाढू शकतात. त्याऐवजी भरपूर ताजी फळे, भाज्या आणि भरपूर पाणी प्या. काही पदार्थ पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकतात. गाजर, पालक आणि व्हिटॅमिन्स ए आणि ई समृद्ध असलेले ड्रायफ्रूट्स खाण्यास सुरुवात करा. तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिडसाठी तुमच्या आहारात मासे, जवस आणि अक्रोड यांचा समावेश करा.
हायड्रेशन-
त्वचेला हायड्रेट ठेवण्यात पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे . हायड्रेटेड त्वचा कमी तेल तयार करते, ज्यामुळे पिंपल्सची शक्यता कमी होते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
त्वचेची काळजी घ्या-
त्वचेची नियमित स्वच्छता हा पिंपल्सपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय मानला जातो. दिवसातून दोनदा क्लींजरने चेहरा धुण्याने केवळ जास्तीचे तेल आणि घाण निघून जात नाही, तर छिद्रे देखील स्वच्छ राहतात. त्वचेला टोन केल्याने छिद्रे मोकळी होण्यास मदत होते आणि त्वचेचे पीएच संतुलन नियंत्रित होते. नंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा जे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि तेलाचे उत्पादन संतुलित करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






