Marathi News

आठवड्याभरात पिंपल्स होतील गायब, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय

Published:
अनेकांना चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात. त्यासाठी काही घरगुती उपाय ट्राय करता येतात.
आठवड्याभरात पिंपल्स होतील गायब, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय

Home remedies to get rid of pimples:   सतत होणारा वातावरणातील बदल, धूळ, पावसातील आर्द्रता, केमिकल्सयुक्त प्रॉडक्टस अशा अनेक गोष्टींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्स दूर करण्यासाठी पुन्हा केमिकल्सयुक्त प्रॉडक्टस वापरले जातात. त्यामुळे चेहरा आणखी खराब होतो.

प्रत्येकालच आपला चेहरा नितळ आणि गुळगुळीत असावा असे वाटते. परंतु त्यासाठी तुम्ही केमिकल्सचा वापर न करता काही घरगुती उपायांचा वापर केला पाहिजे. असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पिंपल्सपासून आराम मिळवू शकता. चला पाहूया हे उपाय नेमके काय आहेत…..

 

कडुलिंब-

आयुर्वेदात पिंपल्स दूर करण्यासाठी कडुलिंब सर्वात उपयुक्त समजले जाते. कडुलिंबात अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून लगेच आराम मिळतो. यासाठी २० ते २५ ताजी कडुलिंबाची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्यावी. ही पेस्ट अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावी. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. असे केल्याने काही दिवसांतच पिंपल्स आणि डाग दूर होतील

कोरफड-
आयुर्वेदात कोरफडलासुद्धा विशेष महत्व आहे. त्यामुळेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडचा वापर केला जातो. कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्स दूर करण्यात मदत मिळते. यासाठी ताज्या कोरफडचा जेल घेऊन तो चेहेऱ्यावर लावा. २० मिनिटे असाच राहू द्या नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.

हळदी-
हळदी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हळदीमुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. त्यामुळे पिंपल्सचादेखील समावेश होतो. हळदीला चेहेऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात शिवाय चेहऱ्यावर चमक येते. यासाठी एक चमचा मधात अर्धा चमचा हळदी मिसळून चेहेऱ्यावर लावून घ्या. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही दिवसांतच फरक दिसून येईल.

 

चंदन-

आयुर्वेदानुसार चंदनसुद्धा पिंपल्स कमी करण्यात मदत करते. चंदन त्वचेवरील घाण आणि मृतपेशी काढून टाकण्यास मदत करते. शिवाय त्वचेला थंड करण्यासही मदत करते. यासाठी एक चमचा चंदन पावडरमध्ये अर्धा कच्चे चमचा दूध आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावून २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पिंपल्स दूर होण्यास मदत होईल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews