पित्त असलेल्या लोकांनी खा ‘हे’ ५ पदार्थ, दूर होतील विविध समस्या

Published:
पित्त प्रकृती असलेल्यांसाठी, गरम पदार्थ आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हिवाळ्यात अधिक समस्या निर्माण करू शकतात.
पित्त असलेल्या लोकांनी खा ‘हे’ ५ पदार्थ, दूर होतील विविध समस्या

Remedies to reduce  pitta dosha:  आयुर्वेदानुसार आपले शरीर वात, पित्त आणि कफ यांनी बनलेले आहे. म्हणून, निरोगी राहण्यासाठी या तिन्हींमध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. जर यापैकी एकही असंतुलित झाला तर त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. थंडीत आपण सर्वजण गरम पदार्थ खाण्याची सवय लावतो. या ऋतूत आले, लसूण आणि गरम मसाले मोठ्या प्रमाणात सेवन केले जातात. यामुळे शरीरात पित्तचे असंतुलन होऊ शकते.

विशेषतः पित्त प्रकृती असलेल्यांसाठी, गरम पदार्थ आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हिवाळ्यात अधिक समस्या निर्माण करू शकतात. म्हणून, हिवाळ्यात पित्त संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. पित्त दोष असलेल्या लोकांनी पदार्थ सेवन करावेत याबाबत आपण जाणून घेऊया……

भोपळा-
भोपळा ही एक अत्यंत फायदेशीर भाजी आहे. हिवाळ्यात पित्ताचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही भोपळा खाऊ शकता. भोपळ्यामध्ये थंडावा असतो, जो पित्ताला शांत करतो. भोपळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीर निरोगी ठेवतात.

दही –
हिवाळ्यात दही खाल्ल्याने पित्त दोष शांत होण्यास मदत होते. दह्यामध्ये थंडावा असतो. जो शरीराची उष्णता शांत करण्यास मदत करतो. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. तुम्ही मध किंवा खडीसाखर मिसळलेले दही खाऊ शकता. दह्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

तूप –
जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्ही तुमच्या हिवाळ्याच्या आहारात तूप नक्कीच समाविष्ट करावे. आयुर्वेदात तूप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तूप पित्त दोष संतुलित करण्यास मदत करते. हिवाळ्यात तूप सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. ते शरीराला थंड करते. विशेषतः गायीच्या तूपात थंडावा असतो. ते पित्ताचे संतुलन ठेवण्यास मदत करते.

फळे –
हिवाळ्यात तुम्ही फळे आवर्जून खावीत. जर तुम्हाला पित्तप्रवृत्ती असेल तर फळे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. पित्त संतुलित करण्यासाठी तुम्ही द्राक्षे, संत्री, सफरचंद आणि ईडलिंबू खाऊ शकता. ही फळे खाल्ल्याने पित्त संतुलित होण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. फळे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीराची उष्णता थंड होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews