प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यात महिलांनी आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ, बाळ राहील हेल्दी

Published:
नवव्या महिन्यात गर्भात बाळाची हालचाल वाढते आणि तेव्हा त्याला इतर तिमाहींपेक्षा जास्त पोषक तत्वांची आवश्यकता असते.
प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यात महिलांनी आहारात सामील करा ‘हे’ पदार्थ, बाळ राहील  हेल्दी

What to eat in the ninth month of pregnancy:   प्रत्येक गर्भवती महिलेला तिचे बाळ निरोगी असावे आणि त्याचा मानसिक आणि शारीरिक विकास योग्य व्हावा असे वाटते. बाळाचे वजन संतुलित असेल तरच हे शक्य आहे. गर्भधारणेदरम्यान महिला विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खातात असे अनेकदा दिसून येते, परंतु असे असूनही, बाळाचे वजन कमी राहते. त्यामुळे प्रत्येक गर्भवती महिलेने तिच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

खासकरून ९ व्या महिन्यात आहारात हे पदार्थ असणे गरजेचे आहे. कारण या वेळेपर्यंत, बाळाचे सर्व अवयव पूर्णपणे विकसित होतात, बाळाची हालचाल वाढते आणि या काळात त्याला इतर तिमाहींपेक्षा जास्त पोषक तत्वांची आवश्यकता असते. आज आपण ९ व्य महिन्यात स्त्रियांनी काय काय खावे ते जाणून घेऊया…..

फळे-
गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात महिलांनी विविध प्रकारची फळे खावीत. यामध्ये किवी, केळी आणि स्ट्रॉबेरी सारखी फळे गर्भवती महिलेचे आरोग्य सुधारतात. तसेच , बाळाचे वजनही वाढण्यास मदत करतात. फळांमध्ये विविध जीवनसत्त्वे असतात, जी बाळाच्या वाढीसाठी महत्वाची असतात.

विविध डाळी-
जर एखाद्या गर्भवती महिलेला नवव्या महिन्यात तिच्या बाळाचे वजन कमी असल्याचे लक्षात आले, तर तिने तिच्या आहारात निश्चितच विविध डाळींचा समावेश करावा. डाळी लोह आणि प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये फायबर, फोलेट आणि कॅल्शियम देखील असते. डाळी झिंकचादेखील एक चांगला स्रोत आहेत. जे प्रसूतीशी संबंधित समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

ड्रायफ्रूट्स आणि नट्स-
प्रत्येक महिलेने तिच्या नवव्या महिन्यात ड्रायफ्रूट्स आणि नट्सचे सेवन नक्की करावे. परंतु कोणत्याही पदार्थाचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे. ड्रायफ्रूट्स आणि नट्स पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई यासह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

अ‍ॅव्होकॅडो-
गरोदरपणाच्या ९ व्या महिन्यात अ‍ॅव्होकॅडो खाणेदेखील बाळाच्या निरोगी वजनासाठी फायदेशीर मानले जाते. गर्भवती महिलांना ९ व्या महिन्यात अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते. अ‍ॅव्होकॅडो हे व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन बी६ ने समृद्ध असलेले फळ आहे. शिवाय, त्यात अतिरिक्त कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)