शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ ४ पदार्थ

Published:
Last Updated:
शरीरातील रक्ताभिसरण, पचनसंस्था आणि स्नायूंसाठी प्रोटीन आवश्यक आहेत. आहारात प्रोटीनची कमतरता शरीराला कमकुवत करते.
शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ ४ पदार्थ

High-protein foods:  आजकाल बदलेल्या जीवनशैलीत स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाश्ता पौष्टिक आणि पोटभर असला पाहिजे. नाश्त्यात पौष्टिक अन्न खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि शरीराला ताजेतवाने वाटते. वेळेअभावी बरेच लोक पौष्टिक नाश्ता करू शकत नाहीत. पण नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे.

शरीरातील रक्ताभिसरण, पचनसंस्था आणि स्नायूंसाठी प्रोटीन आवश्यक आहेत. आहारात प्रोटीनची कमतरता शरीराला कमकुवत करते. नाश्त्यात उच्च प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराचा योग्य विकास होतो आणि आजार दूर होतात. प्रोटीनची कमतरता टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यात या उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता…..

मशरूम –
मशरूम आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक घटकांसह भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. १०० ग्रॅम मशरूममध्ये अंदाजे ३० ग्रॅम प्रोटीन असतात.

बीन्स –
बीन्समध्येदेखील भरपूर प्रोटीन असतात. प्रोटीनसोबतच बीन्समध्ये कॅल्शियम, सिलिकॉन, लोह, मॅंगनीज, बीटा-कॅरोटीन, प्रथिने, पोटॅशियम आणि तांबे देखील पुरेशा प्रमाणात असतात. तुम्ही त्याच्यापासून बनवलेला नाश्ता सहजपणे घेऊ शकता.

हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे –
नाश्त्यात हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे खाल्ल्याने पुरेसे पोषण मिळते. बटाट्यांऐवजी, पोह्यामध्ये वाटाणे आणि शेंगदाणे घाला. शेंगदाणे हे प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. १०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये २६ ग्रॅम प्रोटीन असतात. तर वाटाण्यामध्ये प्रति १०० ग्रॅम ५ ग्रॅम प्रोटीन असतात.

मूग –
मूगात फॅट्स कमी आणि जास्त प्रोटीन असते. तुम्ही नाश्त्यात त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता. अंदाजे १०० ग्रॅम मूगाच्या डाळीमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews