आरोग्यासाठी फायदेशीर आहे नाचणीची आंबील, जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

Published:
नाचणीपासून अतिशय पौष्टिक आंबीलसुद्धा बनवली जाते. या आंबीलमध्ये थंडगार ताक घालून प्यायला खूपच चविष्ट लागते.
आरोग्यासाठी फायदेशीर आहे नाचणीची आंबील, जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

Ragi or Nachani Ambil Recipe:  महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागांमध्ये नाचणीची आंबील खूप लोकप्रिय आहे. ती शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला तोंडात अल्सर, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ही आंबील एक सुपरफूड आहे.

नाचणीपासून अनेकजण भाकरी, डोसा, इडली आणि अलीकडे तर केकसुद्धा बनवले जात आहेत. नाचणी हा मैद्याला एक आरोग्यदायी पर्याय आहे. नाचणीपासून अतिशय पौष्टिक आंबीलसुद्धा बनवली जाते. या आंबीलमध्ये थंडगार ताक घालून प्यायला खूपच चविष्ट लागते. परंतु या पारंपरिक रेसिपी आता फारशा बनवल्या जात नाहीत. त्यामुळे अनेकांना आंबील कशी बनवायची असा प्रश्न पडतो. त्यामुळेच आज आपण नाचणीच्या आंबीलची अगदी साधी सोपी रेसिपी जाणून घेऊया….

नाचणीची आंबील बनवण्यासाठी साहित्य-

-३ टेबलस्पून नाचणीचे पीठ
-२ कप पाणी
-१ कप ताक
-चवीनुसार मीठ
-४ लसणाच्या पाकळ्या
-बारीक चिरलेली कोथिंबीर

नाचणीची आंबील बनवण्याची रेसिपी-

-आंबील बनवण्यासाठी अर्वप्रथम एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या.

-आता त्यात अर्धा कप पाणी घाला आणि चांगले मिसळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.

-दीड कप पाणी गॅसवर ठेऊन चांगले उकळू द्या.

-पाणी उकळू लागले की, त्यात तयार केलेले नाचणीचे पीठ, लसूण घाला.

-त्याला चांगली उकळी आणा आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा. आता त्यावर कोथिंबीर घालून ताक मिसळून त्याचा आस्वाद घ्या.

नाचणीचे फायदे-
डायबिटीससाठी फायदेशीर-
नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजेच ते रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते, जे हार्मोनल संतुलनासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.  कारण रक्तातील साखरेतील चढ-उतार इन्सुलिनच्या पातळीवर आणि इतर हार्मोन्सवर परिणाम करू शकतात.

ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते-
नाचणीमध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे महिलांच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)