मांड्यांना रॅशेज येऊन चालणे-फिरणे कठीण झालंय? करा ‘हे’ घरगुती उपाय

Published:
त्वचा कपड्यांमध्ये अडकली तर चालताना मांड्यांमध्ये घर्षण होते. या घर्षणामुळे मांड्यांमध्ये लाल चट्टे आणि पुरळही उठतात.
मांड्यांना रॅशेज येऊन चालणे-फिरणे कठीण झालंय? करा ‘हे’ घरगुती उपाय

Remedies for thigh rashes:   बहुतेकदा मांड्यांना रॅशेज किंवा पुरळ येण्याची समस्या होते. त्यामुळे चालणे-फिरणेही त्रासदायक बनते. टाईट जीन्स किंवा पँट घातल्याने अनेकदा मांड्यांवर रॅशेज येतात. जर त्वचा कपड्यांमध्ये अडकली तर चालताना मांड्यांमध्ये घर्षण होते. या घर्षणामुळे मांड्यांमध्ये लाल चट्टे आणि पुरळही उठतात. जर याची काळजी घेतली नाही तर घाम आणि पाण्याच्या संपर्कात आल्याने ते संसर्गात बदलू शकतात.

कधीकधी संसर्ग इतका तीव्र होतो की चालणे किंवा बसणे कठीण होते. अशा परिस्थितीत मांड्यांवर लहान लाल ठिपके दिसतात आणि त्वचेवर जळजळ आणि खाज सुटू लागते. जर समस्या गंभीर झाली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. चला जाणून घेऊया हे उपाय काय आहेत…..

कोरफड –
जेव्हा मांड्यांचा संसर्ग कमी होतो आणि जखम बरी होऊ लागते. तेव्हा कोरफडचा गर लावायला सुरुवात करा. ते त्वचेला शांत करेल आणि बरे होण्यास प्रोत्साहन देईल. त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म संसर्ग रोखण्यास आणि त्वचेला बरे होण्यास मदत करतात.

टी ट्री ऑइल –
तुम्ही संसर्ग आणि पुरळ दूर करण्यासाठी टी ट्री वापरू शकता. ते खोबरेल तेलात मिसळा आणि लावा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हे टाळा.किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

टाइट कपडे घालणे टाळा –
टाइट कपडे घालल्याने संसर्ग वाढू शकतो. म्हणून थोडेशे लूज आणि आरामदायी कपडे घाला. यामुळे त्वचेला कापडाचा स्पर्श होणार नाही आणि संसर्ग आणखी वाढणार नाही. त्वचेला आराम देण्यासाठी नॉन-स्टिक पट्टी लावा. अशा परिस्थितीत, ओलावा दूर करण्यासाठी सुती कपडे घाला. घट्ट कपडे घालणे टाळा. सिंथेटिक अंडरवेअर घाला जेणेकरून त्वचा ओढली जाणार नाही.

स्वच्छता ठेवा-
घाम आणि पाण्याच्या संपर्कात आल्याने बॅक्टेरिया वाढून इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून, चांगली स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या मांड्या स्वच्छ करण्यासाठी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी साबण वापरा. ​​इन्फेक्शन झालेला भाग चांगल्या साबणाने किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)