नात्यात जोडीदाराकडून तुमची फसवणूक तर होत नाहीय ना? ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Published:
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलत आहे. तर ते ओळखण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
नात्यात जोडीदाराकडून तुमची फसवणूक तर होत नाहीय ना? ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

 How to know if your partner is lying:   तुम्ही ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करता आणि ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता ती व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलते तेव्हा तुमचा विश्वास तुटतो. विशेषतः जेव्हा त्याचे खोटे दुसऱ्या कोणाकडून उघड होते. कोणत्याही नात्यात विश्वास सर्वात महत्वाचा असतो. जर दोन व्यक्तींमध्ये विश्वास नसेल तर त्या नात्याचे भविष्य असू शकत नाही.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलत आहे. तर आधी पुराव्याच्या आधारे या संशयाची पुष्टी करा. संशय घेऊन नाते बिघडवण्याऐवजी, सत्य शोधून काढले तर बरे होईल. या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील…..

 

वागण्यात अचानक बदल होणे-

तो तुमच्याशी त्याच्या रोजच्या वागण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वागेल. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बराच काळ राहत असता तेव्हा तुम्हाला माहिती असते की तुमचा जोडीदार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसा वागेल.

पण अचानक त्याचे वर्तन बदलू लागते. जेव्हा तुमचा जोडीदार दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू करतो तेव्हा तो दुसऱ्या खोलीत तासांतास फोनवर बोलतो, पण जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा तो म्हणतो की तो बातम्या वाचत होता आणि मेल तपासत होता.

आवाज बदलणे-
जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या शैलीत अचानक बदल झाला, तर हे देखील खोटे बोलण्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत आवाज कमी होऊ लागतो आणि समोरची व्यक्ती काहीतरी लपवत असल्याचे स्पष्ट होते.

पापण्यांची हालचाल-
चेहरा खूप काही सांगून जातो, तो खोटे बोलणे देखील सहज पकडू शकतो. जेव्हा कोणी खोटे बोलते तेव्हा त्याच्या पापण्या जास्त वेळा फडफडू लागतात. तो आतून हे प्रकरण संपण्याची वाट पाहत आहे. असे लोक डोळ्यात डोळे घालून बोलणे देखील टाळतात.

 

सतत ओठ चावणे-

खोटे बोलण्यापूर्वी, ती गोष्ट मनात कोरली जाते. अशा परिस्थितीत दोन्ही ओठांमध्ये कंपन दिसून येते आणि खोटे बोलणारी व्यक्ती अनेकदा ओठ चावू लागते. इथे तुम्ही त्याचा खोटेपणा सहज पकडू शकता.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews