पोटातील घाण काढून फेकेल हे लहानसं फळ; वैज्ञानिकांचा दावा – कॅन्सरचा धोका होईल कमी

Written by:Smita Gangurde
Published:
मात्र फक्त किवी खाऊन चमत्कार होणार नाही तर यासोबत संतुलित डाएटचाही समावेश करणं आवश्यक आहे.
पोटातील घाण काढून फेकेल हे लहानसं फळ; वैज्ञानिकांचा दावा – कॅन्सरचा धोका होईल कमी

किवी एक लहान, हिरवं आणि रसरशीत फळ. दिसायला लहान असतं तरी याचे फायदेही अनेक आहेत. हे फळ चवदार तर असतंच, मात्र आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जर तुम्ही नियमित दोन किवी खाल्ले तर तुमच्या पोटाचे अनेक आजार दूर होऊ शकतील.

अमेरिकेच्या बोस्टन शहरातील गॅस्ट्रोअँटोरोलॉजिस्ट डॉ. त्रिशा पसरीचा आपल्या पेशंटना दररोज किवी खाण्याचा सल्ला देतात. किवी खाल्ल्याने पचन सुधारतं आणि शरीराला आवश्यक विटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडेंट्स मिळतं. हे एक छोटंस फळ कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

किवी फळ का आवश्यक आहे?

एका किवीमध्ये साधारण आठ ग्रॅम फायबर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेतून दिलासा मिळतो. टॉयलेटला जाणं सोपं होतं. यामध्ये एक्टिनिडिन नावाचं खास एंजाइन असतं. ज्यामुळे खाल्लेलं प्रोटीन लवकर पचण्यास मदत होते. या एंजाइमचा उपयोग मांस मऊ करण्यासाठीही वापरलं जातं.

रिसर्च काय सांगतो?

२०२२ मध्ये न्यूजीलँड, इटली आणि जपानच्या वैज्ञानिकांनी एका अभ्यास दिल्यानुसार, दररोज दोन किवी खाल्ल्याने लोकांना टॉयलेट योग्य वेळेत आणि सहज होते. पोटदुखी, गॅस आणि टॉयटेलमध्ये जोर लावण्याचा त्रास…बद्धकोष्ठता कमी होते.

डॉ. पसरीचा यांनी सांगितलं की, किवी हे फळ आलुबुखारा आणि फायबर सप्लिमेंटहून जास्त परिणामकारक आहे. किवीमधील फायबरमुळे पोट सहजपणे साफ होतं.

kiwi

२०११ च्या नॉर्वेच्या एका अभ्यासानुसार, किवी खाल्ल्याने DNA डॅमेज (ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो) कमी झाला. २०२३ च्या चीनमधील अभ्यासानुसार, किवी खाणाऱ्यांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका १३ टक्क्यांनी कमी होतो. किवीमध्ये विटॅमिन सी, ई, के आणि अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे शरीरातून कॅन्सर, हॉर्ट अटॅक आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

किवी कसं खाल?

दिवसभरात कधीही किवी खाऊ शकता. जेवणानंतर काहीतरी गोड खावंस वाटतं, अशीवेळी किवी खाऊ शकता. किवीवरील सालही खाऊ शकता. कारण यामध्ये जास्त फायबर असतं. किवी दही, नट्स आणि फळांसोत खाऊ शकता. सॅलेडमध्ये टोमॅटो, काकडी आणि अवाकाडोसह मिक्स करून खाऊ शकता. अंड्यासह साइड डिश म्हणून किवी खाल्लं जाऊ शकतं. अगदीत प्रोटीन शेकमध्ये ब्लेंड करूनही किवीचं सेवन करता येऊ शकतं.

मात्र फक्त किवी खाऊन चमत्कार होणार नाही तर यासोबत संतुलित डाएटचाही समावेश करणं आवश्यक आहे.