Yoga for sinus: हिवाळा सायनसच्या रुग्णांसाठी थोडासा त्रासदायक असू शकतो. याकाळात थंड वातावरणामुळे सायनसच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. ज्यामुळे श्वसनमार्गात सूज, सर्दी, ऍलर्जी, नाकातील फोड, श्लेष्मा, डोकेदुखी आणि आवाजात बदल अशी लक्षणे दिसून येतात. या स्थितीसाठी औषधेदेखील लगेच आराम देत नाहीत. अशावेळी सायनसच्या समस्येसाठी योगासन हा एक उत्तम पर्याय आहे.
योगासनांमुळे सायनसची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. योगासन अनेक रोगांना दूर करण्यास, त्यावर उपचार करण्यास मदत करते. विविध प्रकारच्या समस्यांसाठी विविध योगासनांचा सराव केला जातो. त्याचप्रमाणे, सायनसच्या समस्या दूर करण्यासाठी काही योगासन फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया ही योगासने नेमकी कोणती आहेत……
हे ही वाचा
पवनमुक्तासन-
पवनमुक्तासन करण्यासाठी, सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि श्वास घ्या. आता, एक गुडघा वाकवा, दोन्ही हातांच्या बोटांना एकमेकांत जोडा आणि गुडघा तुमच्या पोटाजवळ आणा. श्वास सोडा, डोके वर करा आणि गुडघा तुमच्या नाकाजवळ आणा. १० सेकंदांसाठी तुमचा श्वास रोखून ठेवा, या स्थितीत राहा आणि नंतर तुमचा पाय सरळ करा. दुसऱ्या पायानेही हीच प्रक्रिया पुन्हा करा.
हलासन –
हलासन करण्यासाठी, सर्वातआधी पाठीवर झोपा आणि दोन्ही हात जमिनीवर सपाट ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि दोन्ही पाय वर करा. आता, तुमचे पाय मागे वाकवा आणि तुमचे पायाचे बोट जमिनीवर सपाट ठेवा. तुमचे डोके सरळ ठेवा. दोन ते तीन मिनिटे या स्थितीत रहा, नंतर सामान्य स्थितीत परत या.
पश्चिमोत्तानासन –
सायनसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, पश्चिमोत्तानासन नक्की करा. यासाठी सरळ बसा आणि तुमचे पाय एकमेकांच्या जवळ ठेवून सरळ रेषेत पुढे ताणा. नंतर, दोन्ही हात वरच्या दिशेने घेऊन जा, तुमची कंबर सरळ ठेवा. वाकून दोन्ही हातांनी तुमचे पायाचे बोट धरा. गुडघे वाकवू नका आणि तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा. हे आसन डोकेदुखीपासूनदेखील आराम देते.
उत्तानासन –
उत्तानासन करण्यासाठी, सरळ उभे राहा आणि खोलवर श्वास घेत दोन्ही हात वर करा. नंतर पुढे वाका आणि दोन्ही हातांनी जमिनीला स्पर्श करा. तुमचे गुडघे सरळ ठेवा. काही क्षण ही स्थिती अशीच धरा, नंतर हात वर उचलत श्वास सोडा आणि तुमच्या सामान्य स्थितीत परत या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)