Remedies for oily skin:   अनेक लोकांना तेलकट त्वचेमुळे त्रास होत असतो. त्यामुळे ते अनेक महागडी उत्पादने वापरत असतात. पण तेलकट त्वचेवर अशी उत्पादने लावावीत जी केवळ त्वचेतील तेल कमी करत नाहीत तर तिला पोषण देखील देतात. तेलकट त्वचेपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. ही उत्पादने महाग असतात आणि बहुतेकदा त्वचेला सहन होत नाहीत.

अशात तेलकट त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी, काही घरगुती घटकांपासून भोपळ्याचा फेस पॅक बनवता येतो. हा पॅक फक्त त्वचेला हायड्रेटडच ठेवणार नाही तर तेलकटपणाची समस्या देखील दूर करेल. भोपळ्यामुळे त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते आणि त्वचेची चमक वाढते. तसेच चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते आणि त्वचा घट्ट होते.चला पाहूया फेस पॅक नेमके कसे बनवायचे आणि कसे वापरायचे……

ओटमील –
भोपळा आणि ओटमीलचा फेस पॅक बनवण्यासाठी, भोपळ्याची प्युरी, मध आणि ओटमील असे सर्व घटक एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा, हलक्या हाताने चोळा. २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, तुमचा चेहरा पाण्याने धुवा. या पॅकमुळे ब्लॅकहेड्स कमी होतात आणि तेल कमी होते.

दही –
भोपळा आणि दह्याचा फेस पॅक बनवण्यासाठी, दही, भोपळ्याची प्युरी आणि मध असे घटक एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर २० मिनिटे लावा. नंतर, तुमचा चेहरा पाण्याने धुवा. या पॅकमुळे त्वचेतील जास्तीचे तेल कमी होते आणि तुमची त्वचा चमकदार राहते.

लिंबू –
हा फेस पॅक बनवण्यासाठी भोपळ्याची प्युरी, लिंबाच्या रस आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे लावा. नंतर, तुमचा चेहरा पाण्याने धुवा. हा पॅक तुमची त्वचा घट्ट करेल आणि तेलकट त्वचेपासून आराम देईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)