सकाळी अंथरुणातून उठताच सतत शिंका येतात? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम

Published:
हवामानात अचानक बदल झाल्यामुळे लोकांना यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
सकाळी अंथरुणातून उठताच सतत शिंका येतात? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम

Ayurvedic remedies for morning sneezing:  बहुतांश लोकांना सकाळी उठल्याबरोबर सतत शिंका येऊ लागतात. याला वैद्यकीय शास्त्रात अ‍ॅलर्जिक राइनाइटिस म्हणतात. कधीकधी हवामानात अचानक बदल, थंड वातावरण, धुळीचा संपर्क, कोणताही रंग किंवा स्प्रे आणि प्रदूषण यामुळे अ‍ॅलर्जिक राइनाइटिसची समस्या उद्भवू शकते.

श्वास घेताना हवेतील धुळीचे कण शरीरात प्रवेश करतात आणि शरीरात अशी प्रतिक्रिया होते. यामुळे शिंका येतात. हवामानात अचानक बदल झाल्यामुळे लोकांना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज आपण या समस्येसाठी काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया…..

तमालपत्राचा चहा-
तमालपत्राचा चहा हे एक अतिशय फायदेशीर ड्रिंक आहे. त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्मांनी समृद्ध असलेले तमालपत्र जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. त्यामुळे शिंकासुद्धा कमी होतात.

लवंग चहा-
लवंगाचा चहा वारंवार शिंका येणे यासारख्या अ‍ॅलर्जीक राहिनाइटिसची लक्षणे कमी करू शकते. लवंग चहामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे प्रथम अ‍ॅलर्जीनचे परिणाम कमी करतात आणि नंतर रोगप्रतिकारक शक्तीला त्यांच्याशी लढण्यास मदत करतात. लवंग चहा अँटीहिस्टामाइन म्हणून देखील कार्य करते आणि अ‍ॅलर्जी शांत करते.

अश्वगंधाचा चहा-
अश्वगंधाच्या चहामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात. जे अ‍ॅलर्जीक राहिनाइटिसची लक्षणे कमी करू शकतात. ते घसा खवखवणे, डोकेदुखी, नाकातून पाणी वाहणे आणि सायनस कंजेशनमध्ये देखील मदत करते. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात.

पुदिन्याचा चहा-
पुदिन्याच्या चहामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असल्याचे आपण नेहमीच ऐकलं आहे. ते अ‍ॅलर्जीक राहिनाइटिसची लक्षणे लवकर कमी करू शकते. नियमित सेवनाने हंगामी संसर्ग, डोकेदुखी आणि सर्दी यासारख्या अनेक समस्या टाळण्यास देखील मदत होऊ शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews