घोरण्याच्या सवयीचा प्रचंड त्रास होतोय? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

Published:
घोरण्याची समस्या सामान्य असली तरी अनेकदा त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे काही घरगुती उपाय ट्राय करून पाहा.
घोरण्याच्या सवयीचा प्रचंड त्रास होतोय? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

Home remedies for snoring:   बहुतांश लोक घोरण्याच्या समस्येने हैराण असतात. घोरणे हे जास्त प्रमाणात थकवा, ताण आणि कधीकधी बदलत्या हवामानात नाक बंद झाल्यामुळे होऊ शकते. जर तुम्ही एकटे झोपत असाल तर घोरण्याचा आवाजाचा तितकासा फरक पडत नाही. परंतु जर कोणी तुमच्या शेजारी झोपले असेल तर ते त्यांच्या झोपेत अडचण आणू शकते.

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला घोरण्याचा त्रास होत असेल, तर आज आपण घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी करता येणारे साधेसोपे उपाय पाहूया. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व घटक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये सहज उपलब्ध आहेत.चला जाणून घेऊया या उपायांबद्दल…..

नाकात तूप घालणे-
घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी तूप हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक मानले जाते. घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी, नाकात तूप घालून झोपा. तूप लावण्यासाठी ते कोमट करा आणि थोडे थंड झाल्यावर ते नाकात घाला. नाकात तूप लावल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

वेलची पावडर-
वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी, कोमट पाण्यात वेलची किंवा त्याची पावडर मिसळा आणि दररोज झोपण्यापूर्वी प्या.

पुदिन्याच्या तेलाने गुळण्या-
घोरण्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या तेलाने गुळण्या करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. पुदिन्याच्या तेलाने गुळण्या केल्याने नाकाच्या मार्गातील सूज कमी होते आणि श्वास घेण्यास होणारा त्रास दूर होतो, ज्यामुळे घोरणे थांबण्यास मदत होते. पुदिन्याच्या तेलाने गुळण्या करताना, लक्षात ठेवा की त्यात थंडावा असतो, म्हणून हिवाळ्यात ते जास्त वापरू नये.

ऑलिव्ह ऑइल आणि मध-
घोरणे कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल आणि मध खूप उपयुक्त ठरू शकतात. झोपण्यापूर्वी, १ चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये २ ते ४ थेंब मध मिसळा आणि त्याचे सेवन करा . काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews