How to reduce sugar cravings: आजकाल प्रत्येकजण वजन कमी करण्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देत आहेत. यामध्ये डाएटिंग ही महत्त्वाची भूमिका बजावते. डाएटिंग करताना लोक आपल्या आहारातून साखर बाजूला करतात. तसेच खेळ, अभिनय आणि इतर क्षेत्रातील लोक तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकदा साखर खाणे टाळतात.
साखर केवळ वजन वाढण्यासच कारणीभूत ठरत नाही तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.परंतु डाएटिंग करताना सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. म्हणूनच, डाएटिंग दरम्यान गोड खाण्याची इच्छा कशी दूर करावी याबाबत आज आपण जाणून घेऊया……
अंजीर-
डाएटिंग करताना साखरेची इच्छा कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात अंजीर समाविष्ट करू शकता. त्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असते. तरीही ते साखरेची तल्लफ कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. अंजीर खाल्ल्याने तुमचे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते. ते कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
खजूर-
वजन कमी करताना तुमच्या आहारात गोडवा आणण्यासाठी, तुम्ही नैसर्गिक साखर म्हणून खजूर समाविष्ट करू शकता. सर्व प्रकारच्या मिठाईंमध्ये साखरेचा पर्याय म्हणून खजूर वापरता येतात. तसेच जेव्हा तुम्हाला साखर खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही दररोज ५ ते ६ खजूर खाऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे, विशेषतः हिवाळ्याच्या हंगामात हे अतिशय चांगले आहे.
काळे मनुके-
काळे मनुके खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यांचे सेवन केल्याने फक्त साखरेची इच्छा कमी होण्यास मदत होत नाही, तर त्यातील लोहाचे प्रमाण रक्त भरून काढते. काळ्या मनुक्यांमधील फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते. ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






