Marathi News

मराठी माणसाच्या घरातील ही तीन पेय तुमची उन्हाळ्यातील दाहकता झटपट करतील कमी

Published:
उन्हाळ्यात, शरीराची तहान भागवणारे आणि ऊर्जा देणारे काहीतरी ड्रिंक प्यावेसे वाटते.जर तुम्हाला काहीतरी थंड आणि आरोग्यदायी प्यायचे असेल तर तुम्ही या लेखचा आधार घेऊ शकता.
मराठी माणसाच्या घरातील ही तीन पेय तुमची उन्हाळ्यातील दाहकता झटपट करतील कमी

 What drinks to drink in summer:  तापमान वाढत असताना, त्याच्याशी संबंधित आजारांपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक होते कारण अति उष्णतेमध्ये उष्माघातासारख्या समस्यांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, काही अन्नपदार्थ असे आहेत जे नैसर्गिकरित्या उष्णतेचा प्रभाव कमी करतात.

तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करतात. ज्यामुळे उष्णतेचा सामना करणे सोपे होते.आज अशा काही पेयांबद्दल जाणून घेऊया जे उष्णतेपासून आराम देतात. आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात सहजपणे उपलब्ध होतात. चला तर मग पाहूया….

 

१)  ताक पिण्याचे फायदे-

ताक नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता काढून टाकते आणि पोटालाही आराम देते. त्यात भरपूर प्रोबायोटिक्स असतात. जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.

तसेच ताक शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवते. घामामुळे निघून गेलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थ बदलते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

 

२) कोकम सरबतचे फायदे-

कोकम सरबत उन्हाळ्याच्या महिन्यांत तुमच्या शरीरातून निघून गेलेल्या पाण्याची भरपाई करते, निर्जलीकरण रोखते आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स प्रदान करण्यास मदत करते.

कोकममध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे, आपल्या आजीच्या काळापासून आम्लपित्त, अल्सर, सर्दी आणि युरीन इन्फेक्शन कमी करण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

 

३) आंब्याचं पन्हं पिण्याचे फायदे-

 

कच्च्या आंब्याच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए आढळते. जे शरीरातील फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्समधील असंतुलनामुळे होणाऱ्या तणावापासून शरीराचे रक्षण करते. याशिवाय, आंब्यामध्ये भरपूर द्रव असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. साखरेशिवाय पेय पिणे अधिक फायदेशीर आहे.

मीठ आणि काही मसाले घालून बनवलेले हे पेय केवळ इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यास मदत करत नाही तर निर्जलीकरण देखील रोखते. सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीरात द्रव संतुलन राखण्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्वाचे आहेत. त्यात पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असते. जे पचन सुधारते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. हे शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करते.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

 

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews