मुंबई– ह्रदय हे आपल्या शरीरात इंजिनाप्रमाणे काम करतं. दिवस-रात्र न थांबता ह्रदय काम करत असल्यामुळे आपण आपली दैनंदिन क्रियाकर्म सहजपणे करु शकतो.

हार्ट अटॅकसारख्या समस्या या एका दिवसात येत नाही, त्यापूर्वी अनेक वर्ष आपलं शरीर याबाबतचे इशारे आपल्याला देत असतं. मात्र अनेकदा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वाढत्या वयाचं, वाढत्या तणावाचं कारण त्यासाठी पुढे करण्यात येतं. मात्र जेव्हा प्रत्यक्षात ह्रदय विकाराचा झटका येतो तेव्हा मात्र सगळेच जण एकदम दचकून जागे होतात.

12 वर्षांपूर्वीपासून मिळत असतात संकेत

नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर 12 वर्ष आधीपासून याबाबतचे संकेत आपल्याला देत असतं. विशेष करुन शारिरीक हालचालीत होणाऱ्या बदलातून हे इशारे मिळत असतात.

अभ्यासात असं समोर आलं आहे की ज्यांना ह्रदय विकाराचा झटका योते त्यांच्या शारिरीक क्रिया 12 वर्षांपासून कमी होण्यास सुरुवात होते आणि अटॅक येण्यापूर्वी 2 वर्ष ते जास्त शारिरिक क्रिया करीत असतात.

हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे सहा संकेत कोणते?

1. शारिरीक क्षमता कमी होते – पहिल्यांदा जितक्या गतीनं चालू शकत असतो तेवढ्या ूर्जेनं चालणं अशक्य होतं.

2. श्वास लागणं- जिना चडताना किंवा जोरात चालताना श्वास लागतो.

3. सातत्यानं थकवा- आराम केल्यानंतरही थकवा गेला असं जाणवत नाही

4. छातीत दबाव किंवा जडपणा- छातीत दुखत नाही पण अस्वाभाविक जाणीव राहते.

5. पायांना आणि पायांच्या घोट्यांना सूज – रक्त प्रवाह कमी झाल्यानं पायानं सूज येण्याचे प्रकार वाढतात

6. झोपण्याशी संबंधित समस्या- सातत्यानं घोरणे किंवा झोप न येणं