Ayurvedic remedies for bowel cleansing: आजकाल पोटाच्या समस्या इतक्या सामान्य झाल्या आहेत की जवळजवळ प्रत्येकालाच हा त्रास होतोय. बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा पोटाच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच लोक अनेकदा भूक न लागणे किंवा आतड्याला सूज असल्याची तक्रार करतात.
काहीवेळा पोट योग्यरित्या स्वच्छ होत नाही. ज्यामुळे आतड्यांमध्ये घाण जमा होते. म्हणून, इतर संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतडे स्वच्छ करणे आवश्यक आहे. आतड्यांतील घाण दूर करण्यासाठी,शौचाला साफ झाले पाहिजे पाहिजे जेणेकरून सर्व घाण मलसोबत बाहेर टाकल्या जातीलयासाठी तुम्हीकही आयुर्वेदिक उपाय करून पाहू शकता…..
हे ही वाचा
गूळवेल-
गूळवेलचे खोड बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी ओळखले जाते. शिवाय, गूळवेलचे खोड आम्लता, गॅस आणि पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सेवन केले जाऊ शकते. गूळवेलचे नियमित सेवन आतड्यांमधून जमा झालेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करते.
ज्येष्ठमधाचे मूळ-
ज्येष्ठमधाचे मूळ पोटाशी संबंधित आजारांसाठी वापरले जाते.आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्येष्ठमधाच्या मुळामध्ये अनेक अशी संयुगे असतात जे आतड्यांमधून जमा झालेली घाण काढून टाकण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला पोटाच्या समस्या येत असतील तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या मुळापासून बनवलेला चहा पिण्याचा प्रयत्न करावा.
तमालपत्र –
पचनाच्या समस्यांवर तमालपत्र एक प्रभावी उपाय म्हणून ओळखले जाते. पचनक्रिया बिघडणे, जळजळ होणे, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. काही तमालपत्रांचे तुकडे करा आणि ते अर्ध्या ग्लास पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर ते सेवन करा. तुमचे आतडे स्वच्छ करण्यासाठी हे मिश्रण काही दिवस नियमित घ्या.
हिंग –
पचनक्रिया बिघडण्यापासून ते बद्धकोष्ठतेपर्यंतच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हिंग हा सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक आहे. जर पचनक्रिया बिघडल्यामुळे किंवा बद्धकोष्ठतेमुळे तुमच्या आतड्यांमध्ये घाण साचली असेल तर एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा हिंग पावडर आणि थोडे काळे मीठ मिसळा आणि दररोज सकाळी ते सेवन करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)