केस गळती रोखतात ‘या’ ४ आयुर्वेदिक पद्धती, नियमित केल्यास मिळेल फायदा

Published:
केस गळती रोखतात ‘या’ ४ आयुर्वेदिक पद्धती, नियमित केल्यास मिळेल फायदा

 Ayurvedic remedies for hair growth:   आजकाल अनेक लोक केस गळणे, केस विरळ होणे, दुभंगलेले केस, केसांमध्ये कोंडा अशा केसांच्या अनेक समस्याने त्रस्त आहेत. या समस्यांमुळे फक्त तुमचे सौंदर्यच कमी होत नाही तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे लोक केसांच्या समस्यांने सतत चिंतेत असतात.

केसांच्या विविध समस्यांची अनेक कारणे असू शकतात यामध्ये हार्मोनल असंतुलन, तणाव, बदलेली जीवनशैली, आहार, जंकफ़ूड अशी अनेक कारणे असू शकतात. शिवाय लोक केसांवर अनेक केमिकल्सचा वापर करत असतात. त्यामुळे केस खराब होतात. केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे आयुर्वेदिक उपाय केसांच्या सर्व समस्या दूर करून केस वाढण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया हे उपाय नेमके काय आहेत….

 

शिरोधारा-

शिरोधारा एक प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. यामध्ये हळूहळू डोक्यावर तेल सोडले जाते. आणि डोक्याला मालिश केली जाते. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. तणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे केस मजबूत होतात. केसांचे गळणे थांबते. शिवाय केसांची वाढ होते. परंतु एखाद्या आयुर्वेदिक चकित्सक केंद्रात जाऊन हे उपचार करणे फायदेशीर असते.

शिरोलेप हेअर मास्क-
शिरोलेप हेअर मास्क हे आयुर्वेदिक हेअर मास्क आहे. यामध्ये जास्वंद, कडुलिंब आणि मेथीसारख्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर केला जातो. हा उपाय करण्यासाठी सांगितलेले सर्व साहित्य पावडरच्या स्वरूपात एकत्र करून ते पाण्यामध्ये मिक्स करून केसांना लावावे. ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास केसांना लावून ठेवावे. यामुळे केसांना पोषण मिळेल. केस मजबूत होतील.

नस्य कर्म-
नस्य कर्म हीसुद्धा एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे. यामध्ये नाकातून उपचार केले जातात. यामध्ये नाकात दोन-तीन तेलाचे थेंब टाकले जातात. या उपायाने शरीरातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. केस गळणे कमी होते. परंतु हा उपायसुद्धा आयुर्वेदिक केंद्रात करणे योग्य असते.

 

शिरो अभ्यंग-

शिरो अभ्यंग ही एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे. शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याची मालिश होय. आयुर्वेदात ही पद्धत केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केस वाढीसाठी फायदेशीर समजली जाते. यामध्ये भृंगराज आणि आवळ्याच्या तेलाने मसाज केली जाते. यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने केसांची मालिश करा. असे केल्याने केस मजबूत होतील, केस गळणे थांबतील आणि केस वाढण्यासही मदत होईल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews