फुफ्फुसांसाठी सुपरफूड आहेत ‘हे’ ४ पदार्थ, दररोज खाल्ल्यास मिळेल फायदा

Published:
Last Updated:
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच योग्य पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
फुफ्फुसांसाठी सुपरफूड आहेत ‘हे’ ४ पदार्थ, दररोज खाल्ल्यास मिळेल फायदा

What to eat to keep lungs strong:   फुफ्फुसे आपल्या शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे. ते निरोगी ठेवणे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही समस्येचा एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फुफ्फुसे ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात.

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच योग्य पौष्टिक आहार घेतला पाहिजे. विशेषतः सकाळचे जेवण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी सकाळी काय-काय खावे…..

बीट-
बीटमध्ये लोह आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. बीट शरीरात रक्त पुन्हा भरून काढते. बीट फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. बीट खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. तुमचे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी बीटचा रस पिऊ शकता. तुम्ही ते सॅलड म्हणून देखील खाऊ शकता. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते.

हळदीचे पाणी-
हळदीचे पाणी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. जे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. हळदीचे पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही दररोज हळदीचे पाणी पिऊ शकता.

अक्रोड आणि बदाम-
अक्रोड आणि बदाम हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ड्रायफ्रूट्स आहेत. फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी, तुम्ही नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाऊ शकता. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. तुम्ही दररोज सकाळी तुमच्या आहारात भिजवलेले अक्रोड आणि बदाम समाविष्ट करू शकता.

ओट्स-
तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही दररोज सकाळी ओट्सचे सेवन करू शकता. ओट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्समध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. ओट्सचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तुम्ही दूध किंवा दह्यासोबत ओट्सचे सेवन करू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews