Marathi News

डायबिटीस ते तणावापासून आराम देतात ५ प्रकारचे आयुर्वेदिक चहा, रोज करा सेवन

Published:
आपल्या स्वयंपाकघरात असे काही मसाले आहेत जे आपल्यासाठी औषधी वनस्पतींसारखे काम करतात. त्यापासून आयुर्वेदिक चहा बनवू शकता.
डायबिटीस ते तणावापासून आराम देतात ५ प्रकारचे आयुर्वेदिक चहा, रोज करा सेवन

Benefits of Ayurvedic Tea:  आजकाल अनेक लोक पुन्हा एकदा आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करत आहेत. अनेक आरोग्य समस्यांवर औषधी वनस्पती रामबाण उपाय मानल्या जातात. म्हणूनच, प्राचीन काळी अनेक आजारांवर औषधी वनस्पतींनी उपचार केले जात होते. खोकला, सर्दी किंवा सांधेदुखी असो, औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होऊ शकतात.

त्याचप्रमाणे, आपल्या स्वयंपाकघरात असे काही मसाले आहेत जे आपल्यासाठी औषधी वनस्पतींसारखे काम करतात. जर त्यापासून आयुर्वेदिक चहा बनवून त्याचे सेवन केले तर ते अनेक आजारांपासून आराम देऊ शकते. आज आपण अशाच काही आयुर्वेदिक चहाचे फायदे जाणून घेऊया……

जास्वंदचा चहा –
जास्वंदीचा चहा बनवण्यासाठी ही फुले पाण्यात उकळली जातात. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.

दालचिनी चहा –
दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड आणि सिनामिक अॅसिड सारखे जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे असतात. ही संयुगे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी देखील ते सेवन करू शकता. दालचिनी चहा बनवण्यासाठी, दालचिनीच्या काड्या २ कप पाण्यात उकळा. पाणी कमी झाल्यावर ते गाळून घ्या आणि थोडे मध घाला आणि ते सेवन करा.

कॅमोमाइल चहा –
जर तुम्हाला ताण किंवा चिंता असेल तर तुम्ही कॅमोमाइल चहा करून पिऊ शकता. त्यात एपिजेनिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूला आराम देण्यास मदत करते. तुम्ही झोपण्यापूर्वी ते पिऊ शकता. हा चहा झोपेच्या समस्यांपासून देखील आराम देते.

बडीशेपचा चहा –
बडीशेपच्या चहामध्ये अॅनेथोल नावाचे संयुग असते. त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ते सेवन केल्याने गॅस, पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पचन समस्या दूर होण्यास मदत होते. ते पचन करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews