Marathi News

सांध्यांची सूज आणि वेदना कमी करतात ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, आहारात करा सामील

Published:
आहारातील बदल फक्त सांध्यातील सूजच कमी करत नाहीत तर ती सुरुवातीलाच होण्यापासून रोखू शकतात.
सांध्यांची सूज आणि वेदना कमी करतात ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, आहारात करा सामील

Ayurvedic remedies to reduce joint swelling:  हिवाळ्यात अनेकदा सांध्याच्या समस्या येतात. काहींना सांधेदुखीचा त्रास होतो, तर काहींना गुडघेदुखीचा त्रास होतो. विशिष्ट वयानंतर सांध्यातील सूज येणे ही खूप सामान्य समस्या मानली जाते. कधीकधी सांधेदुखी आहारातील चुकांमुळे किंवा जास्त किंवा अपुऱ्या व्यायामामुळे होते. सांधेदुखी ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी प्रत्यक्षात ती खूप वेदनादायक असू शकते.

सांध्यातील सूज कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. आहारातील बदल फक्त सांध्यातील सूजच कमी करत नाहीत तर ती सुरुवातीलाच होण्यापासून रोखू शकतात. पण काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत जे सांध्यातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया……

काळी मिरी-
काळी मिरी ही प्रत्येक भारतीय घरात आढळणारी एक सामान्य घटक आहे. ती भाज्या आणि सॅलडची चव वाढवते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काळ्या मिरीमध्ये लक्षणीय अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी आणि सूज दूर करण्यास मदत करू शकतात. सांधेदुखी आणि सूज दूर करण्यासाठी तुम्ही काळ्या मिरी तेलाने मालिश करू शकता. तुम्ही तुमच्या आहारात काळी मिरी देखील समाविष्ट करू शकता.

हळद-
हळद सर्वच घरामध्ये उपलब्ध असते. हळद ही कर्क्यूमिननेसमृद्ध असलेली वनस्पती आहे. कर्क्यूमिन सांधे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. सांध्याची सूज दूर करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात हळद समाविष्ट करू शकता किंवा प्रभावित भागात हळदीची पेस्ट लावू शकता.

निलगिरी तेल-
निलगिरी तेल सांध्यांची सूज आणि वेदना दोन्ही कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. निलगिरी तेलात अँटीव्हायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. जे जळजळ आणि वेदना कमी करतात. सांध्यांच्या जळजळीसाठी, तुमच्या हातावर निलगिरी तेलाचे 5 ते 6 थेंब घेऊन मालिश करा. तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात निलगिरी तेल देखील घालू शकता आणि आंघोळ करू शकता. संधिवात किंवा ऑस्टियोआर्थरायटिसने ग्रस्त असलेले लोक मालिशसाठी निलगिरीचे तेल देखील वापरू शकता.

ओवा-
ओवा ही एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सांध्यांची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओव्याचा समावेश करू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews