Foods harmful to children’s health: प्रत्येक पालकाला आपले मुल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावे असे वाटते.पण आजची मुले बाहेरील जंकफूड खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामुळे लहान वयातच विविध आजार होण्याचा धोका वाढतो. धावपळीच्या जीवनशैली आणि बदलेल्या कामाच्या पद्धतींमुळे, पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेकदा वेळ नसतो.
परिणामी, पालक अनेकदा घाईघाईने बाहेरून विविध प्रकारचे पदार्थ खरेदी करतात. हे पदार्थ फक्त मुलांच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाहीत तर त्यांच्या वाढीवरही परिणाम करतात. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, हंगामी फळे समाविष्ट करा. आज आपण मुलांना कोणते पदार्थ खायला देणे टाळावे याबाबत जाणून घेऊया……
खारट पदार्थ-
बाजारात मिळणाऱ्या अनेक स्नॅक्समध्ये मीठ मोठ्या प्रमाणात असते. हे पदार्थ मुलांना चविष्ट वाटू शकतात, परंतु त्यांच्या नियमित सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मुलांना बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स देणे टाळणे महत्वाचे आहे.
गोड पदार्थ-
आजकाल मुले बिस्कीट, चॉकलेट आणि मिठाई जास्त खातात. हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहेत आणि मुलांचे वजनदेखील वेगाने वाढवतात. हे पदार्थ खाल्ल्याने मुले जास्त खातात, ज्यामुळे पोटदुखी आणि पचनक्रिया बिघडू शकते.
फास्ट फूड-
आजकाल मोठ्यांसोबत मुलेसुद्धा बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खातात. यामुळे लहान वयातच लठ्ठपणा, मधुमेह आणि थकवा येऊ शकतो. या पदार्थांमुळे मुलांमध्ये जास्त खाण्याची प्रवृत्ती वाढते, ज्यामुळे वजन जलद वाढते.
प्रक्रिया केलेले पदार्थ-
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे मुलांसाठी हानिकारक असू शकते. प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या वाढीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांना कधीही प्रक्रिया केलेले पदार्थ देऊ नयेत. त्यांना पेस्ट्री, चिप्स, स्नॅक्स आणि बिस्किटे दररोज देणे टाळा.
कोल्डड्रिंक्स-
बहुतेक उपलब्ध असलेल्या कोल्डड्रिंक्समध्ये गोड करण्यासाठी जास्त प्रमाणात साखर घातलेली असते. जी शरीरासाठी हानिकारक असण्यासोबतच मुलांमध्ये दात किडण्यास कारणीभूत ठरू शकते आणि मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढवू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






