What causes poor digestion: आजकाल बदलेल्या जीवनशैलीनुसार ऑफिसला जाणारे लोक त्यांचा जवळपास संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये घालवतात. म्हणून, ऑफिसमध्ये निरोगी सवयी फॉलो करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा, लोक कामावर तासन्तास घालवल्यानंतर, घरी परततात आणि मग आपल्या आरोग्याबद्दल विचार करतात. परंतु ऑफिसमध्येदेखील आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
ऑफिसमध्ये जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे हे तुमच्या आतड्यांचे आरोग्य खराब असल्याचे लक्षण आहे. आतड्यांचे आरोग्य खराब झाल्यामुळे हळूहळू आजार होऊ शकतात. त्यामुळेच आपण आज ऑफिसमधील काही चुकीच्या सवयी जाणून घेऊया ज्यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते….
एकाच ठिकाणी बसून राहणे –
ऑफिसमध्ये जास्त वेळ बसून राहण्याची सवय पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. दर ४५ ते ६० मिनिटांनी पाच मिनिटे उभे राहा आणि ऑफिसमध्ये हलके स्ट्रेचिंग करा किंवा थोडेसे चालत राहा. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने आतड्यांचे आरोग्य देखील मजबूत होईल.
पाणी कमी पिणे –
ऑफिसच्या कामात व्यस्त असताना हायड्रेशनकडे दुर्लक्ष करू नये. ऑफिसमध्ये कमी पाणी पिल्याने पचनावर परिणाम होतो आणि हायड्रेशनचा अभाव शरीराला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापासून रोखतो. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेशन राखण्यासाठी नारळ पाणी, भाज्यांचा ज्यूस आणि हर्बल टी देखील घ्या.
उपाशी राहणे-
ऑफिसमध्ये उपाशी राहण्याची सवय आतड्यांचे आरोग्य खराब करू शकते. बरेच लोक जास्त कामाच्या ताणामुळे नाश्ता वगळतात किंवा वेळेवर जेवत नाहीत. यामुळे पचनसंस्थेचे असंतुलन होते आणि पोटफुगी होते.
वॉशरूमला न जाणे –
बरेच लोक सकाळी लवकर कामावर निघून जातात आणि त्यांना योग्यरित्या शौचास जाता येत नाही. लोक ऑफिसमध्ये वॉशरूममध्ये जाण्यास कचरतात कारण त्यांना सामाजिक दबाव जाणवतो. दररोज मल रोखून ठेवण्याची सवय तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. घराबाहेर पडण्यापूर्वी, कोमट पाणी पिऊन पचनक्रिया सक्रिय करा आणि ऑफिसमध्ये वॉशरूम वापरण्यास अजिबात संकोच करू नका.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






