Marathi News

आतडे स्वच्छ करून सडण्यापासून रोखतात ‘या’ भाज्या, आहारात करा सामील

Published:
आयुर्वेद एक सोपा उपाय सांगतो, आपल्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून आपण आपले आतडे स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकतो.
आतडे स्वच्छ करून सडण्यापासून रोखतात ‘या’ भाज्या, आहारात करा सामील

Foods that cleanse the intestines:   आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, असंतुलित आहारामुळे आणि जास्त वेळ बसून राहण्याची सवय यामुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्या येतात. यामध्ये बद्धकोष्ठता आणि आतड्यांतील सूज हे सामान्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी अनियमित जेवण, पुरेसे पाणी न पिणे, जंक फूड आणि फायबरची कमतरता असलेला आहार यामुळे पचनसंस्था कमकुवत होते. ज्यामुळे आतड्यांसंबंधी समस्या होते.

या समस्येवर उपाय म्हणून लोक अनेकदा विविध औषधे आणि टॉनिकचा अवलंब करतात, जे कधीकधी हानिकारक ठरू शकतात. परंतु, आयुर्वेद एक सोपा उपाय सांगतो. आपल्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून आपण आपले आतडे स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकतो. या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया जलद करते आणि आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकते. या भाज्या नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया….

दोडका-
दोडका ही निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी एक उत्तम भाजी आहे. त्यात भरपूर फायबर असते.जे पोट स्वच्छ करण्यास मदत करते. दोडका खाल्ल्याने आतड्यांमधील कचरा आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे आतडे स्वच्छ होतात. दोडक्यामध्ये इतर अनेक पोषक घटक देखील असतात जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि योग्य पचन राखण्यास मदत करतात. या भाजीचे नियमित सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

भोपळा-
भोपळा आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. त्यात फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे पचन सुधारतात. भोपळ्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. भोपळ्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात, जे आतड्यांचा दाह कमी करण्यास मदत करतात.

पालक-
पालक ही एक अशी पालेभाजी आहे जी आतडे स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यात फायबर, लोह आणि मॅग्नेशियम असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. पालक खाल्ल्याने आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि हानिकारक बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये विषारी पदार्थांचे संचय कमी होते.

दुधी भोपळा-
दुधी भोपळा ही आतडे स्वच्छ करण्यासाठी एक उत्कृष्ट भाजी मानली जाते. ती हलकी, ताजी असते आणि पचन सुधारते. भोपळ्यामध्ये चांगले पाणी असते. जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि आतड्यांमधून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. भोपळ्यामध्ये फायबर देखील भरपूर असते, जे आतड्यांतील स्वच्छता करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews