Ayurvedic remedies for thyroid: महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या वाढत आहेत. हार्मोनल असंतुलनामुळे थायरॉईडच्या समस्या सामान्य आहेत. याचे दोन प्रकार आहेत, हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम. हायपरथायरॉईडीझमच्या बाबतीत वजन झपाट्याने कमी होऊ लागते, तर हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमध्ये वजन झपाट्याने वाढू लागते.
जर तुम्हीही थायरॉईडचे रुग्ण असाल तर थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी हर्बल ड्रिंक प्यायला सुरुवात करा. आपण या हर्बल ड्रिंकची रेसिपी जाणून घेऊया…..
थायरॉईडसाठी हर्बल ड्रिंक बनवण्यासाठी साहित्य-
दालचिनी पावडर – १/४ टीस्पून
हळद – १/४ टीस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून
किसलेले आले – १/४ टीस्पून
जिरेपूड – १/४ टीस्पून
मध – चवीनुसार
थायरॉईडसाठी हर्बल ड्रिंकची रेसिपी-
-थायरॉईडसाठी फायदेशीर हर्बल ड्रिंक बनवण्यासाठी आधी एका भांड्यात १ ग्लास पाणी गरम करा.
-उकळलेल्या पाण्यात दालचिनी, आले, जिरे पावडर आणि हळद घालून मंद आचेवर कमीत कमी ५ मिनिटे उकळवा.
-आता हे पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यावर एका कपमध्ये गाळून घ्या.
-नंतर कपमध्ये १ चमचा लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा.
-तुम्ही तुमच्या आवडीनुसार १ चमचा मध देखील घालू शकता.
-नंतर कोमट करून थोडे-थोडे प्या. यामुळे थायरॉईडच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
हर्बल ड्रिंकचे फायदे-
-या ड्रिंकमधील पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे तुमचे पचन सुधारण्यास मदत करू शकतात. ते सेवन केल्याने थायरॉईडचे कार्य आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
-या ड्रिंकमध्ये हळदी आहे आणि हळदीत कर्क्यूमिन असते. जे अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. ते सेवन केल्याने थायरॉईड नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





