Marathi News

पेरू खाऊन कंटाळलात? घरी बनवा झटपट पेरूचे लोणचं…

Published:
चवीला आंबट गोड असलेल्या पेरूंपासून झटपट घरी बनवा पेरूचे लोणचं
पेरू खाऊन कंटाळलात? घरी बनवा झटपट पेरूचे लोणचं…

पेरू जगभर प्रसिद्ध आहे. पेरू अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी समृद्ध आहे. पेरूचे सेवन केल्याने अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. हे फळ व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. पेरू खायला चविष्ट आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पेरू हे फळं खायला खूप आवडत. पेरू खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला पेरूपासून लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

पेरूचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पेरू
  • मीठ 
  • गूळ
  • तेल 
  • मोहरी
  • हळद
  • धना पावडर 
  • लिंबाचा रस
  • चवीनुसार गरम मसाला

पेरूचे लोणचे बनवण्याची सोपी पद्धत

पेरू स्वच्छ धुवून त्याचे छोटे तुकडे करा. एका भांड्यात तेल गरम करा आणि त्यात मोहरी, हळद, धना पावडर आणि गरम मसाला टाका. पेरूचे मिश्रण भांड्यात टाका आणि मिक्स करा नंतर मीठ आणि गूळ घालून मिक्स करा. गूळ वितळू लागला की मंद आचेवर शिजवा. त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिक्स करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. लोणचे थंड झाल्यावर एका काचेच्या भांड्यात भरून ठेवा. लोणचे जास्त दिवस टिकवण्यासाठी ते थंड ठिकाणी ठेवावे.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews