जिभेवर फोड येऊन खाणंपिणं कठीण झालंय? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

Published:
जिभेवर फोड आल्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. पण खाणेपिणे अवघड होते.
जिभेवर फोड येऊन खाणंपिणं कठीण झालंय? ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

Home remedies to reduce tongue blisters:   जिभेवर फोड येणे ही एक तोंडाची सामान्य समस्या आहे. आणि ती कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. जिभेवर आलेले फोड साधारणपणे १० ते १२ दिवसांत बरे होतात. त्यांचे दुखणे अगदी वेगळे असते. जिभेवर फोड आल्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.

परंतु ते तुमच्या चवीवर परिणाम करू शकतात. तसेच जिभेवर सतत वेदना होऊ शकतात.ज्यामुळे खाणे -पिणे कठीण होते. जिभेवर आलेल्या फोडीच्या वेदना कमी करण्यासाठी आणि तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. आज आपण हे घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया…..

दही-
दही हे नैसर्गिकरित्या मिळणारे प्रोबायोटिक आहे. दह्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे वेदना आणि सूज कमी करू शकतात आणि फोडांशी संबंधित कोणत्याही संसर्गावर उपचार करू शकतात. दररोज किमान एकदा दही खाल्ल्याने फोड बरे होण्यास मदत होते.

लवंग तेल-
लवंग तेलात युजेनॉल नावाचे संयुग असते. युजेनॉलचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात. एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून गुळण्या केल्याने आणि चूळ भरल्याने फोड बरे होण्यास मदत होते. दिवसातून तीन ते चार वेळा हे करा.

बर्फ-
बर्फात एनेस्थेटिक आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. जे जिभेची सूज कमी करण्यास आणि फोड कमी होण्यास मदत करू शकते. फोड सुन्न होईपर्यंत त्यावर थेट बर्फाचा तुकडा ठेवा. दिवसातून अनेक वेळा हे करा. तुम्हाला वाटल्यास बर्फाचा तुकडा वितळवा आणि थंड पाण्याने गुळण्या करा.

बेकिंग सोडा-
बेकिंग सोड्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्याचे अल्कधर्मी गुणधर्म तोंडाचा पीएच संतुलित करण्यास मदत करतात.ज्यामुळे जिभेचे अल्सर दूर होण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews