Home remedies to reduce uric acid: आजकाल अनेकांना युरिक अॅसिडची समस्या त्रास देतेय. युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ झाल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ झाल्यामुळे संधिवात होतो. संधिवाताच्या रुग्णांमध्ये, युरिक अॅसिडच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्याने सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येऊ शकते.
युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण खाल्लेल्या पदार्थांमुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. त्यामुळेच आपण युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. युरिक अॅसिडची पातळी कमी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया……
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ-
व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते. संधिवाताच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ समाविष्ट करावेत. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
फायबरयुक्त पदार्थ –
शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खावेत. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने युरिक अॅसिड कमी होते.
जवस बिया-
जवस बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जवसाच्या बियांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी, दररोज जवसाच्या बिया खा. तुम्ही जवसाच्या बिया चावून किंवा स्मूदी बनवून विविध प्रकारे वापरू शकता.
ओवा-
ओवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज ओव्याचे पाणी पिल्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी कमी होऊ शकते. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी, रात्रभर पाण्यात ओवा भिजवा आणि दुसऱ्या दिवशी ते सेवन करा. ओव्याचे पाणी नियमितपणे पिल्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी कमी होते.
भरपूर पाणी पिणे-
भरपूर पाणी पिल्याने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते. भरपूर पाणी पिल्याने जमा झालेले युरिक अॅसिड शौचालयातून किंवा लघवीतून बाहेर पडण्यास मदत होते. दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





