MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

युरिक अ‍ॅसिड वाढल्यास अजिबात खाऊ नका ‘या’ भाज्या, बिघडेल आरोग्य

Published:
युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही पदार्थ असे आहेत, जे खाल्ल्यास युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण आणखी वाढू शकते.
युरिक अ‍ॅसिड वाढल्यास अजिबात खाऊ नका ‘या’ भाज्या, बिघडेल आरोग्य

Which vegetables to avoid if uric acid is high:  आजकाल अनेकांना युरिक अ‍ॅसिडची समस्या उद्भवत आहे. युरिक अ‍ॅसिड हा शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, हातापायांच्या बोटांमध्ये सूज येणे, हाडे कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, युरिक अ‍ॅसिड हा असा घटक आहे जो लघवीमधून सहजपणे शरीरातील बाहेर पडत असतो. परंतु खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, बिघडलेली जीवनशैली यामुळे हा घटक शरीरातच जमा होत आहे. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढून सांध्याच्या समस्या त्रास देत आहेत. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही पदार्थ असे आहेत, जे खाल्ल्यास युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण आणखी वाढू शकते. हे पदार्थ कोणते आहेत त्याबाबत जाणून घेऊया….

 

युरिक अ‍ॅसिडमध्ये ‘या’ भाज्या खाणे का टाळाव्यात?

युरिक अ‍ॅसिड हा घटक शरीरातील प्युरीन नावाच्या एका घटकापासून तयार होतो. आणि काही भाज्यांमध्ये प्युरीन नावाचा घटक आढळतो. अशात या भाज्यांचे सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिडची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे सांध्याचे दुखणेही वाढू शकते.

 

पालक-

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पालक एक अतिशय पौष्टिक भाजी आहे. पालकमधून लोह, कॅल्शिअम मिळते. परंतु यामध्ये प्युरीकचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडमध्ये ही भाजी खाल्ल्यास समस्या आणखी वाढू शकते.

फ्लॉवर-
फ्लॉवरच्या भाजीमध्येसुद्धा प्युरीन जास्त प्रमाणत असते. अशात युरिक अ‍ॅसिडदरम्यान फ्लॉवरचे सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिडची समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

अंडी-
अंडी खायला पौष्टिक असली तर यामध्ये प्युरीन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण आणखी वाढू शकते.

मशरूम-
मशरूम चविष्ट भाजी असली तरी त्यामध्येही प्युरीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडमध्ये ते खाणे टाळावे.

ब्रोकोली-
आजकाल निरोगी राहण्यासाठी आहारात ब्रोकोलीचा समावेश केला जात आहे. परंतु त्यामध्येसुद्धा प्युरीनचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच युरिक अ‍ॅसिड असल्यास ते खाणे टाळावे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)