Home remedies to reduce uric acid: आजच्या धावपळीच्या जगात, युरिक अॅसिडची समस्या सामान्य होत आहे. युरिक अॅसिडचे वेळेवर नियंत्रण ठेवले नाही तर त्यामुळे गाउट, सांध्यांची सूज आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार आवश्यक आहे.
युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असते. तुमच्या शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल तर सकाळी रिकाम्या पोटी काय खावे किंवा प्यावे जेणेकरून युरिक अॅसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी करता येईल याबाबत आज आपण जाणून घेऊया…..
तुळशीचे पाणी-
तुळशीमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे पाणी शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते आणि जळजळ कमी करते.
कोमट लिंबू पाणी-
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे युरिक अॅसिड विरघळवून ते लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करते. रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. हे शरीराला क्षारयुक्त करते आणि अॅसिडीटी कमी करते.
आवळा रस-
आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. जो शरीरात युरिक अॅसिड जमा होऊ देत नाही. दररोज सकाळी एक ग्लास ताज्या आवळ्याचा रस प्यायल्याने पचन सुधारते आणि सांध्यांच्या जळजळीपासून आराम मिळतो.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ऑरगॅनिक अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






