लघवीत सतत जळजळ आणि दुर्गंधी येतेय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम

Published:
आयुर्वेदात लघवीच्या समस्येवर अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.
लघवीत सतत जळजळ आणि दुर्गंधी येतेय? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम

Remedies for burning sensation during urination:  आजच्या धावपळीच्या जीवनात, बिघडत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी एक म्हणजे लघवीत जळजळ आणि दुर्गंध येणे होय. ही समस्या अत्यंत सामान्य झाली आहे आणि त्यामुळे अनेकांना त्रास होत आहे.

लघवीची जळजळ आणि दुर्गंधी या समस्या बहुतेकदा डिहायड्रेशन, संसर्ग, मूत्रमार्गाचे संक्रमण किंवा जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होऊ शकते. याव्यतिरिक्त, किडनी स्टोन, मधुमेह आणि इतर आजारांमुळे देखील जळजळ आणि दुर्गंधीयुक्त लघवी होऊ शकते. परंतु आयुर्वेदात या समस्येवर अनेक नैसर्गिक आणि घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. याबाबत जाणून घेऊया…..

आयुर्वेदातील हे उपाय फक्त ही समस्याच दूर करण्यास मदत करत नाहीत तर, शरीराला आतून बळकटी देतात. आयुर्वेदात वेलची, खडीसाखर आणि खरबूजाच्या बियांची पावडर हे या समस्येवर सर्वोत्तम उपचार मानले जातात. या नैसर्गिक पावडरचे सेवन केल्याने लघवीतील जळजळ आणि दुर्गंधीची समस्या कमी करता येते.

यासाठी खरबूजाच्या बिया सुकवून त्यांची पावडर बनवा आणि त्यात खडीसाखर आणि वेलची मिसळा आणि ही पावडर दररोज कोमट पाण्यासोबत घ्या, यामुळे लघवीतील जळजळ आणि दुर्गंधीपासून आराम मिळू शकतो.

लघवी करताना जळजळ होण्याचे एक प्रमुख कारण डिहायड्रेशन असू शकते, म्हणून दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा आणि जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा. पुदिन्याचा चहा किंवा बडीशेपचा चहा पिणेदेखील फायदेशीर ठरू शकते.जर तुम्हाला लघवीचा संसर्ग असेल तर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय टाळा. यामुळे लघवीचा संसर्ग होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)