हिरव्या भाज्या खाताना अजिबात करू नका ‘या’ चुका, मिळणार नाहीत फायदे

Published:
लोक अनेकदा भाज्या वारंवार शिजवतात किंवा जास्त तेल वापरतात. ज्यामुळे त्यांची पौष्टिक मूल्य कमी होतात.
हिरव्या भाज्या खाताना अजिबात करू नका ‘या’ चुका, मिळणार नाहीत फायदे

The right way to eat vegetables:   आपल्या सर्वानांच माहिती आहे की, हिरव्या भाज्या खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि रोगांपासून संरक्षण करतात.परंतु यासाठी फक्त हिरव्या भाज्या खाणे पुरेसे नाही.तर ते योग्य पद्धतीने खाल्ले नाहीत तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात.

लोक अनेकदा भाज्या वारंवार शिजवतात किंवा जास्त तेल वापरतात. ज्यामुळे त्यांची पौष्टिक मूल्य कमी होते. त्यामुळेच आज आपण हिरव्या भाज्या खाताना त्यांचे पूर्ण आरोग्य फायदे घेण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या याबाबत जाणून घेऊया…..

शिजवण्याची पद्धत-
तज्ज्ञांच्या मते भाज्या जास्त वेळ शिजवल्याने व्हिटॅमिन बी, सी आणि फोलेट सारख्या पोषक घटकांचा नाश होतो. भाज्या जास्त शिजवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. भाज्या उकळण्याऐवजी, वाफवून घ्या किंवा हलके परतून घ्या. यामुळे चव आणि पोषक घटक दोन्ही टिकून राहतात. कमी वेळासाठी भाज्या शिजवल्याने शरीराला सर्व पोषक घटक मिळण्यास मदत होते.

वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या-
हिरव्या पालेभाज्या खाताना फक्त एकच हिरवी भाजी खाल्ल्याने त्याचे आरोग्यदायी फायदे मिळत नाहीत. तुमच्या आहारात विविध रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि फोलेट सारखे पोषक घटक असतात. तर लाल आणि नारंगी भाज्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असतात.

भाज्या योग्य प्रमाणात खाणे-
हिरव्या भाज्या खाण्याचे फायदे फक्त तेव्हाच मिळू शकतात जेव्हा तुम्ही त्या योग्य प्रमाणात सेवन करता. हिरव्या भाज्यांचे जास्त सेवन केल्याने गॅस, पोटफुगी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचे योग्य संतुलन ठेवा. यासाठी आहारात भाज्या, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात समाविष्ट करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)