महिन्याला कमी होईल १० किलो वजन, फक्त फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन

Published:
एका डायटेशियनने इंस्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी एक खास डाएट प्लॅन सांगितला आहे.
महिन्याला कमी होईल १० किलो वजन, फक्त फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन

Weight loss diet Marathi:    आजकाल सर्वजणच वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे वजन कमी करण्याचे वेगवेगेळे उपाय शोधत असतात. बरेचजण जिम करतात, काहीजण डाएट करतात तर काहीजण औषधेसुद्धा घेतात. परंतु काहींना त्याचा फायदा होत नाही. अशावेळी ते निराश होतात.

 

 महिन्यात कमी होईल १० किलो वजन-

परंतु आता एका डायटेशियनने इंस्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी एक खास डाएट प्लॅन सांगितला आहे. डायटेशियन तुलसी नितीन यांच्या मते, तुम्ही जर हा डाएट प्लॅन फॉलो केला तर महिन्याभरात तब्बल १० किलो वजन कमी होण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊया हा आहार नेमका कसा आहे…

 

वजन कमी करण्यासाठी एक खास डाएट प्लॅन-

सोमवार-

सकाळचा नाश्ता (१० वाजता) – २ ब्राऊन ब्रेड आणि २ उकडलेली अंडी

दुपारचे जेवण ( १-२ वाजता) – १चपाती, हिरव्या वाटण्याची भाजी, सॅलड आणि १ वाटी दही

दुपारचा नाश्ता ( ५ वाजता) – स्वीट कॉर्न चॅट

रात्रीचे जेवण-   १५० ग्रॅम ग्रिल्ड चिकन आणि उकडलेल्या हिरव्या भाज्या

मंगळवार-
सकाळचा नाश्ता (१० वाजता) – २ नाचणी डोसा आणि सांबर

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)- २०० ग्राम ब्राऊन राईस आणि फिश करी, उकडलेल्या भाज्या

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) –  २खजूर आणि ५ बदाम

रात्रीचे जेवण-   १ चपाती, १५० ग्रॅम प्रॉन्स करी आणि उकडलेल्या भाज्या

बुधवार-
सकाळचा नाश्ता (१० वाजता) –  उकडलेल्या किंवा भाजलेल्या भाज्यांसोबत २ अंड्याचे ऑम्लेट

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)- १ चपाती, हरभऱ्याची उसळ, सॅलड आणि ताक

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) – भाजलेले मखाने

रात्रीचे जेवण-  मूग डाळीची खिचडी वाटीभरून आणि सॅलड

गुरुवार-
सकाळचा नाश्ता (१० वाजता) – १ कप रात्रभर भिजवलेले ओट्स आणि फळे

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)-  ३-४ वाटी भात, फिश करी आणि सॅलड

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) – १०० ग्राम ग्रिल्ड पनीर

रात्रीचे जेवण- १अंड्याचे ऑम्लेट आणि उकडलेल्या भाज्या

शुक्रवार-
सकाळचा नाश्ता (१० वाजता) – २ तांदळाच्या इडली आणि सांबर

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)- १चपाती, १५० ग्राम चिकन आणि सॅलड

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) – शेंगदाण्याची चॅट

रात्रीचे जेवण-  १ कप चिकन सूप आणि उकडलेली ब्रोकोली

शनिवार-

सकाळचा नाश्ता (१० वाजता) – २ बेसन चिला आणि हिरवी चटणी

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)-  १५० गरम चिकन, ब्राऊन राईस आणि सॅलड

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) – भाजलेले चणे

रात्रीचे जेवण- १ चपाती, सॅलड आणि फिश करी

रविवार-
सकाळचा नाश्ता (१० वाजता) – चिकन सॅन्डविच

दुपारचे जेवण ( १-२ वाजता)- चिकन बिर्याणी आणि सॅलड

संध्याकाळचा नाश्ता ( ५ वाजता) – एक कप दुधाचा चहा किंवा कॉफी

रात्रीचे जेवण- ग्रिल्ड पनीर आणि टोफू भाज्यांसोबत मिक्स करून

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)