रात्रीच्या जेवणात पोळीवर किंवा वरण-भातावर तूप घेतलं की जेवणाची लज्जत वाढते. तूपाच्या सेवनाने दिवसभरातील थकवा दूर होतो. भारतात तूप केवळ एक खाद्यपदार्थ नाही तर आपली संस्कृती, परंपरा आणि आरोग्याचा भाग आहे. मात्र तुपाला इंग्रजीत काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का?
तुपाचं इंग्रजीतील नाव आणि त्यामागचा इतिहास
तुपाला इंग्रजीत क्लेरिफाइड बटर ‘Clarified Butter’ म्हटलं जातं. लोणी मंद गॅसवर गरम केल्यामुळे त्यातील पाणी आणि दुधाचा अंश निघून जातो. भारतात याला तूप म्हटलं जातं. हा शब्द संस्कृतच्या घृत (ghrta) यातून घेण्यात आला. ज्याचा अर्थ स्पष्ट किंवा शुद्ध असा आहे. तुपाचा उपयोग भारतीय संस्कृतीत अनुष्ठानापासून दैनंदिन भोजनापर्यंत केला जातो.
तुपाचे फायदे…
– पचनक्रियेत सुधारणा – तुपातील ब्यूटिरिक अॅसिड पचनक्रिया सुधारते
– त्वचा आणि केसांसाठी – तुपातील अँटीऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे त्वचा उजळते आणि केस मजबूत होतात.
– हृदयाचं आरोग्य – तुपात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
– मेंदूचं आरोग्य – तुपामध्ये कोलीन असतं, ज्यामुळे मेंदुची कार्यक्षमता वाढते.
तुपाचा योग्य उपयोग
– स्वयंपाकात वापर – तुपाचा उपयोग उच्च तापमानात स्वयंपाकासाठी केला जातो. यामध्ये स्मोक पॉइंट उच्च असतो.
– आरोग्यासाठी – एक चमचा तुपाचं सेवन दररोजही करू शकता. विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी.
– धार्मिक विधींमध्ये – तुपाचा दिवा लावणे आणि पूजेत अर्पण करणं भारतीय संस्कृतीचा भाग आहे.





