Which foods should diabetic patients avoid eating:   आजकाल डायबिटीस एक सामान्य समस्या बनली आहे. बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, चुकीचा आहार, बदलेली लाइफस्टाइल यामुळे डायबिटीसचे प्रमाण वाढत आहे. डायबिटीस आहे असा आजार आहे, जो योग्य लाइफस्टाइल आणि योग्य आहाराच्या मदतीने नियंत्रित करता येतो. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपल्या आहारात असे काही पदार्थ असतात ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे डायबिटीसमध्ये आहारात योग्य पदार्थांचाच समावेश करावा लागतो. त्यामुळेच आज आपण अशा काही भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या खाल्ल्याने साखर वाढते. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी त्यांचा आहारात समावेश करणे टाळले पाहिजे. या भाज्या कोणत्या आहेत जाणून घेऊया…

 

बटाटे-

डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी बटाटे खाणे टाळले पाहिजे. आणि खाल्ले तरी योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. कारण बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी आहारात बटाट्याचे प्रमाण फार कमी केले पाहिजे. शिवाय बटाट्यापासून बनलेले तळलेले पदार्थही कमी खाल्ले पाहिजेत.

 

हिरवे वाटाणे-

हिरवे वाटाणेसुद्धा स्टार्च असणाऱ्या भाज्यांच्या यादीत समाविष्ट होतात. वाटाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. एक कप वाटण्यामध्ये २० ग्रॅम स्टार्च असते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते. म्हणून आपल्या आहारातून हिरवे वाटाणे आजच कमी करावेत.

 

कॉर्न-

डायबिटीस असणाऱ्यांनी कॉर्न खाणेसुद्धा टाळले पाहिजे. कारण अर्ध्या कप कॉर्नमध्ये २१ ग्रॅम कार्ब्स असतात. आणि फक्त २ ग्रॅम फायबर असते. डायबिटीसमध्ये फायबरयुक्त अन्न महत्वाचे असते. कॉर्नमध्ये फायबर कमी असल्याने आणि कार्ब्स जास्त असल्याने रक्तातील साखर वाढते. त्यामुळे डायबिटीस असल्यास कॉर्नचा आहारात समाविष्ट करू नये.

 

रताळे-

रताळ्याला गोड बटाटेसुद्धा म्हटले जाते. बटाट्याप्रमाणेच रताळ्यामध्येसुद्धा स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डायबिटीसमध्ये रताळे खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी आहारात रताळे खाणे टाळले पाहिजे.

 

भोपळा-

भोपळ्यामध्येसुद्धा कार्ब्स आणि कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात. एक कप भोपळ्याच्या लगद्यात १६ ग्रॅम कार्ब्स असतात. आणि फक्त २ ग्रॅम फायबर असते. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी जास्त प्रमाणात भोपळ्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते. म्हणून डायबिटीस रुग्णांनी भोपळ्याची भाजी किंवा त्यापासून बनलेले पदार्थ खाणे टाळावेत.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)