Marathi News

हाडे मजबूत करण्यासाठी कोणते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक आहेत? जाणून घ्या

Last Updated:
हाडे मजबूत बनवण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि प्रोटीन उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा योग्य करणे आवश्यक आहे.
हाडे मजबूत करण्यासाठी कोणते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक आहेत? जाणून घ्या

What to do to strengthen bones:   हाडे कमकुवत झाल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. हाडे कमकुवत झाल्याने सांधेदुखी, गुडघेदुखी अशा अनेक समस्या निर्माण होतात. आजकाल, खराब जीवनशैली, जंक फूड आणि कोल्डड्रिंक्सच्या सेवनामुळे लोकांना हाडांच्या आरोग्याच्या समस्या येत आहेत.

हाडे मजबूत बनवण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि प्रोटीन उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा योग्य करणे आवश्यक आहे. लोक वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे प्रोटीन आणि सप्लिमेंट्स खात आहेत, ज्यामुळे ही समस्या वाढत आहे. त्यामुळेच आज आपण हाडे मजबूत करण्यासाठी काही नैसर्गिक उपयांबाबत जाणून घेऊया……

व्हिटॅमिन डी –
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हाडांच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक मानले जाते. तुमच्या शरीराची व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी, दररोज किमान १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाशात घालवा. शक्य असेल तेव्हा सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. असे म्हटले जाते की सकाळच्या सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणांमध्ये जास्त व्हिटॅमिन डी असते.

कोलेजन –
कोलेजन फक्त त्वचा किंवा केसांसाठीच फायदेशीर नाही. तर ते हाडांसाठीदेखील आवश्यक आहे. कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे हाडांच्या वाढीस मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी आहारात कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार तुमच्यासाठी कोणते कोलेजन योग्य आहे याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

कॅल्शियम –
व्हिटॅमिन डीप्रमाणेच हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. दररोज किमान एक ग्लास दूध प्या. ज्यांना दूध आवडत नाही ते तीळ आणि बाजरीसारखे पर्याय निवडून त्यांच्या कॅल्शियमची गरज पूर्ण करू शकतात.

मॅग्नेशियम –
हाडांच्या विकासासाठी आणि ताकदीसाठी मॅग्नेशियम देखील महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डीचे सेवन कॅल्शियम शोषण्यास मदत करते, तर मॅग्नेशियम व्हिटॅमिन डीची पातळी राखण्यास मदत करते. मॅग्नेशियम मिळविण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात बदाम, केळी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews