Remedies for digestive problems in winter: हिवाळ्यात आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये प्रचंड बदल होतात. थंडीच्या काळात लोक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी जास्त तेलकट, मसालेदार आणि जड पदार्थ खातात, ज्यामुळे पोटावर अतिरिक्त दबाव येतो. यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यासारख्या सामान्य समस्या उद्भवतात.
पण तुम्हाला माहित आहे का की, या समस्यांवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. आले, हळद, लसूण, दालचिनी आणि ओव्यासारखे मसाले फक्त जेवणाचीच चव वाढवत नाहीत तर शरीराला आतून उबदार ठेवून पचनसंस्थेला देखील सुधारतात. आज आपण पचनक्रिया सुधारण्यासाठी अशाच काही टिप्स जाणून घेऊया…..
हळद –
हळद हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील एक आवश्यक भाग आहे. त्यातील कर्क्यूमिन घटक जळजळ कमी करते आणि पचनास मदत करते. थंड हवामानात, हळद शरीरातील अंतर्गत उष्णता राखण्यास मदत करते, पोटाचे स्नायू सक्रिय ठेवते. झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे अत्यंत फायदेशीर आहे. तसेच तुम्ही हळद कोमट पाण्यात मिसळून सकाळी पिऊ शकता.
दालचिनी –
दालचिनी हा एक असा मसाला आहे जो केवळ चवीलाच उत्तम नसतो तर, हिवाळ्यात पोटाच्या समस्या टाळण्यास देखील मदत करतो. तो भूक नियंत्रित करतो आणि पोटफुगी कमी करतो. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म निरोगी पचनसंस्था ठेवतात. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिणे पचनासाठी खूप चांगले असते.
आले –
आल्याला हिवाळ्यातील सुपरफूड म्हटले जाते. त्याचे अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवतात आणि पचनसंस्था सक्रिय ठेवतात. जर तुम्हाला वारंवार गॅस, पोटफुगी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरेल. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्या किंवा गरम पाण्यात आले उकळून चहासारखे घ्या.
लसूण –
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी लसूण हा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. त्यातील सल्फर संयुगे पोटातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतात. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत कच्च्या लसणाची एक पाकळी खा. किंवा हलकेसे तुपात भाजून खा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





