Marathi News

सकाळी-सकाळी खूप शिंका येतात? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Published:
सकाळी वारंवार शिंक येण्याची अनेक कारणे असू शकतात. अ‍ॅलर्जीक रायनाइटिस हे मुख्य कारण असू शकते.
सकाळी-सकाळी खूप शिंका येतात? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Home remedies for sneezing in the morning:  हिवाळ्यात काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर वारंवार शिंका येण्याचा तरस होतो. ही समस्या प्रामुख्याने सकाळी दिसून येते. त्यामुळे कोणताही त्रास होत नसला तरी, सकाळी तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. जागे झाल्यावर धुळीचे कण तुमच्या नाकात गेल्यावर शिंका येऊ शकतात. याव्यतिरिक्त, श्वसनमार्गावर अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया देखील ही समस्या निर्माण करू शकते.

अ‍ॅलर्जीग्रस्त व्यक्तीच्या बेडशीटवर किंवा बरेच दिवस न धुतलेल्या बेडशीटवर झोपल्यानेदेखील सकाळी वारंवार शिंका येऊ शकतात. या समस्येपासूनआराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. हे घरगुती उपाय नेमके काय आहेत जाणून घेऊया……

सकाळी वारंवार शिंका का येतात?
सकाळी वारंवार शिंक येण्याची अनेक कारणे असू शकतात. अ‍ॅलर्जीक रायनाइटिसीक हे मुख्य कारण असू शकते. याव्यतिरिक्त, जर तुमच्या खोलीचे वातावरण कोरडे असेल तर रात्री नाकात कोरडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे सकाळी शिंका येऊ शकतात. ज्यांना आधीच सायनसची समस्या आहे त्यांना जागे झाल्यावर शिंका येऊ शकतात.

सकाळी शिंका येण्यावर घरगुती उपाय-

आल्याचे सेवन-
आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ते सेवन केल्याने सर्दीमुळे होणारा नाकातील श्लेष्मा साफ होण्यास मदत होते. ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते. वारंवार शिंकण्यापासूनही आराम मिळतो. दोन कप पाण्यात आल्याचे बारीक तुकडे घाला. पाणी एक कप शिल्लक राहेपर्यंत उकळवा. हे पाणी चहासारखे प्यायल्याने समस्येपासून आराम मिळेल.

तुळशीचे पाणी-
आयुर्वेदात तुळशीचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुळशीमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म आहेत. तुळशीचे सेवन केल्याने शरीरात अँटीबॉडीजचे उत्पादन वाढते आणि संसर्ग कमी होतो. जर तुम्हाला सकाळी वारंवार शिंका येत असतील तर तुळशीचा चहा प्यायल्याने आराम मिळू शकतो.

दालचिनीचे सेवन-
दालचिनी प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. दालचिनी सर्दीमुळे होणारे बंद नाक, खोकला आणि घसा खवखवणे दूर करण्यास मदत करते. त्यात अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटीव्हायरल गुणधर्म देखील आहेत. जे वारंवार शिंकण्यापासून आराम देऊ शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews