हिवाळ्यातही शरीरातील पाणी कमी झालंय? हायड्रेटेड राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Published:
हिवाळ्यात अनेकदा तहान कमी लागते त्यामुळे आपण आपसूकच पाणी कमी पितो.ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यातही शरीरातील पाणी कमी झालंय? हायड्रेटेड राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Remedies for dehydration in winter:   जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा ते डिहायड्रेट होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा कमी असल्याने डिहायड्रेशनची लक्षणे दिसतात. जर तुम्हाला डिहायड्रेशनची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हायड्रेटेड कसे राहायचे त्याच्याकडे लक्ष द्या.

हिवाळ्यात अनेकदा तहान कमी लागते त्यामुळे आपण आपसूकच पाणी कमी पितो.ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आज आपण थंडीत हायड्रेटेड राहण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया…..

दही-
तुम्ही तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी दह्याचे सेवन देखील करू शकता. दह्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. तुम्ही दिवसातून दोनदा एक कप दही खावे. दह्याचे सेवन केल्याने डिहायड्रेशन टाळता येईल.

फळे आणि भाज्या-
शरीरात हायड्रेशन ठेवण्यासाठी, तुम्ही पाण्याव्यतिरिक्त भाज्या आणि फळे खाऊ शकता. दिवसातून दोनदा फळे आणि भाज्या खाल्ल्याने डिहायड्रेशन कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सॅलड देखील खाऊ शकता. या पदार्थांमधून पुरेसे पाणी तुमच्या शरीरात जाते.

तुळशीचा रस-
जर तुम्हाला डिहायड्रेटेड वाटत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांचा रस देखील पिऊ शकता. तुळशीच्या पानांचा रस काढून तो एक कप पाण्यात घाला आणि दिवसातून दोनदा प्या.

उसाचा रस-
उसाचा रस डिहायड्रेशन कमी करण्यास मदत करू शकतो. तुम्हाला हिवाळ्यात पाणी जात नसेल तर दिवसात एक-दोनदा तहान भागवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट करण्यासाठी तुम्ही उसाचे रस आनंदाने पिऊ शकता.

बडीशेप पाणी-
डिहायड्रेशन टाळण्यासाठी, तुम्ही बडीशेपचे पाणी देखील पिऊ शकता. एका लिटर पाण्यात बडीशेप उकळा आणि हे पाणी दिवसभर तहान लागल्यास प्या.

जेवणापूर्वी पाणी पिणे-
हायड्रेशनसाठी जेवणापूर्वी कमीत कमी दोन ग्लास पाणी प्यावे. याव्यतिरिक्त, प्रत्येक नाश्ता किंवा जेवणापूर्वी तुम्ही दोन ग्लास पाणी प्यावे. तसेच तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर कमीत कमी ५०० मिली पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला कधीही डिहायड्रेशन होणार नाही आणि तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कायम राहील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews