मानेवरील सुरकुत्या कमी करायच्या आहेत? मग ‘या’ ४ तेलाने करा मसाज

Published:
वयानुसार, त्वचेच्या ऊतींचा पुरवठा कमी होतो आणि कोलेजनची पातळी कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या येतात.
मानेवरील सुरकुत्या कमी करायच्या आहेत? मग ‘या’ ४ तेलाने करा मसाज

Which oils to use to reduce wrinkles:   काही लोकांच्या मानेवर सुरकुत्या येतात. याची अनेक कारणे आहेत. जे लोक त्यांच्या त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत आणि जास्त प्रदूषणाच्या संपर्कात येतात त्यांच्या मानेवर सुरकुत्या येऊ शकतात. जास्तवेळ उन्हात राहिल्याने मानेवर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. खराब आहार आणि ऍलर्जीमुळेदेखील सुरकुत्या आणि बारीक रेषा वाढू शकतात.

त्यासोबतच वयानुसार, त्वचेच्या ऊतींचा पुरवठा कमी होतो आणि कोलेजनची पातळी कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या येतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही तेल मालिशचा वापर करू शकता. आयुर्वेदात तेल मालिशदेखील त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. आज आपण मानेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी कोणते तेल वापरू शकतो जाणून घेऊया……

खोबरेल तेल-
खोबरेल तेल हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. आणि त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवते. खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड असते. खोबरेल तेल त्वचेला संसर्गापासून वाचवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

अ‍ॅव्होकाडो तेल –
या तेलात जीवनसत्त्वे ए, डी आणि ई सारखे पोषक घटक असतात. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.जे सुरकुत्या आणि त्वचेवरील बारीक रेषा कमी करण्यास मदत करते.

जोजोबा तेल –
हे तेल त्वचेसाठी एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ते जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. जोजोबा तेल त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते आणि सुरकुत्या कमी करते.

रोझहिप सीड ऑइल –
रोझहिप ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि के असतात. हे तेल लावल्याने त्वचेच्या पेशींचे उत्पादन उत्तेजित होते, त्वचेचा पोत सुधारतो आणि बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews