Yamaha Electric Scooter : Yamaha ने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर; 169 KM रेंज

Published:
यामाहा EC-06 मध्ये 4 kWh क्षमतेची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली असून, त्यास इंटरनल परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर (IPMSM) जोडण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही मोटर 6.7 kW पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते.
Yamaha Electric Scooter : Yamaha ने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर; 169 KM रेंज

Yamaha Electric Scooter : इंडिया यामाहाने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 अधिकृतपणे लाँच करत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. दमदार रेंज, प्रीमियम फीचर्स आणि यामाहाच्या विश्वासार्ह तंत्रज्ञानामुळे ही स्कूटर लाँच होताच चर्चेत आली आहे. यामाहा EC-06 ची एक्स-शोरूम किंमत 1,67,600 रुपये ठेवण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही स्कूटर निवडक शहरांमधील यामाहाच्या ‘ब्लू स्क्वेअर’ प्रीमियम डीलरशिपवर उपलब्ध होणार आहे. सध्या ही स्कूटर ब्लूश व्हाइट रंगाच्या एकाच पर्यायात सादर करण्यात आली आहे.

१६९ किमीची लांब रेंज (Yamaha Electric Scooter)

यामाहा EC-06 मध्ये 4 kWh क्षमतेची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली असून, त्यास इंटरनल परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर (IPMSM) जोडण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही मोटर 6.7 kW पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी प्रतितास असून, एका चार्जवर तब्बल 169 किमीपर्यंत प्रवास करता येतो, असा यामाहाचा दावा आहे. त्यामुळे दैनंदिन शहरातील वापरासाठी ही स्कूटर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

चार्जिंग, वॉरंटी आणि सुरक्षिततेवर भर

EC-06 ही स्कूटर सामान्य घरगुती वीजपुरवठ्यावर चार्ज करता येते. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तासांचा कालावधी लागतो. यामाहा कंपनीकडून बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किमीची वॉरंटी दिली जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, मोटर आणि बॅटरीला IP67 रेटिंग, तर इतर इलेक्ट्रॉनिक घटकांना IP65 रेटिंग देण्यात आले आहे, त्यामुळे पावसात किंवा कठीण परिस्थितीतही स्कूटर सुरक्षित राहील. Yamaha Electric Scooter

तीन रायडिंग मोड्स आणि मजबूत हार्डवेअर

यामाहा EC-06 मध्ये इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. अरुंद जागांमध्ये स्कूटर सहज हलवता यावी यासाठी रिव्हर्स मोड देखील उपलब्ध आहे. सस्पेन्शनसाठी पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स, तर मागे कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढे आणि मागे 200 मिमी डिस्क ब्रेक्स असून, त्यासोबत CBS (कॉम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम) देण्यात आली आहे.

स्मार्ट फीचर्स आणि भरपूर स्टोरेज

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रंगीत LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असून, त्यावर वेग, बॅटरी स्थिती आणि रायडिंग मोडची माहिती दिसते. पूर्ण LED लाइटिंग स्टँडर्ड आहे. यामाहाच्या Motor Connect-R अ‍ॅपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध असून, रायडिंग अनुभव अधिक स्मार्ट होतो. याशिवाय, 24.5 लिटरची सीटखालील स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे, ज्यामध्ये हेल्मेट किंवा दैनंदिन वापरातील वस्तू सहज मावू शकतात.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews